spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बांद्यातील पूरग्रस्त भागात आशिष शेलार आणि नितेश राणेंनी केली पाहणी, स्थानिकांना २४ तास अलर्ट राहण्याचे आवहान

सिंधुदुर्ग : गेले दोन दिवस राज्यात कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गातील बांदा शहर व परिसर हा पूरग्रस्त असल्याने शहरात प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने २४ तास अलर्ट राहणे गरजेचे आहे.

पुरस्थिती उद्भवल्यास प्रसंगी स्थानिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी. यासाठी आपत्ती व्यवस्थापनची टीम याठिकाणी कार्यरत ठेवावी तसेच रेस्कयू साठी अतिरिक्त साहित्य लागल्यास तात्काळ उपलब्ध करा, अशा सूचना भाजप नेते तथा आमदार अँड आशिष शेलार व आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

 पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार अँड शेलार व राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सायंकाळी बांदा शहराला भेट देत पुरस्थितीची माहिती घेतली. यावेळी सावंतवाडी प्रांतधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, महसूल नायब तहसीलदार मनोज मुसळे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, संजू परब, मंडळ अधिकारी आर वाय. राणे, तलाठी वर्षा नाडकर्णी, सरपंच अक्रम खान, शेर्ले सरपंच उदय धुरी, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, राजेश विरनोडकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरु सावंत, पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई , मधुकर देसाई, विनेश गवस, शाम सावंत, सुनील धामापूरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

स्वतःची साडी सांभाळणं इतकं ही कठीण नाही; नोरा फतेही झाली ट्रोल

 

Latest Posts

Don't Miss