नामांतर राहिले बाजूला आता थेट होणार विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर

हमदनगर हा जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात येतो. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याचं क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मीआहे. तो उत्तरं आणि दक्षिण अहमदनगर असा दोन भागात वास्तव करतो. हिवाळी अधिवेशनात अहमदनगरचे नामांतरण करून अहिल्यादेवी असे करावे हि मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

नामांतर राहिले बाजूला आता थेट होणार विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर

अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात येतो. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याचं क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मीआहे. तो उत्तरं आणि दक्षिण अहमदनगर असा दोन भागात वास्तव करतो. हिवाळी अधिवेशनात अहमदनगरचे नामांतरण करून अहिल्यादेवी असे करावे हि मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. अधिवेशनात या विषयावर बरीच चर्चा करण्यात आली. परंतु मंत्री मंडळाचे एकमत होत नसल्याने अद्याप नामांतरण झाले नाही. नामांतरणाचा मुद्दा बाजूला ठेवून विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरचे अमदार सांग्राम जगताप यांनी विभाजनाची मागणी केली. अहमदनगर जिल्हा हा दोन भागात मोडतो उत्तर व दक्षिण, पण दक्षिण अहमदनगर हा विकासाच्या तुलनेने मागे आहे. म्हणून अहमदनगरचा विकास हा विभागणी करून होईल असे काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मत आहे.

संग्राप जगताप यांनी मांडलेल्या विभाजनाच्या प्रश्नामुळे विधानसभेतील वातावरण गरम झाले. अहमदनगर जिल्यातील राजकीय नेत्यांनी या प्रश्नाचा विरोध केला. त्यामुळे विधानसभेत विभाजनाचा वाद टोकाला गेला. अहमदनगर जिल्याच विभाजन करा हा प्रश्न नवीन नसून जुना आहे फक्त,नव्याने तो पुन्हा विधान सभेत मांडला गेला. या वादात बऱ्याच नेत्यांनी आपली मत मांडली भाजप खासदार सुजय विखे पाटील म्हणाले अहमदनगर जिल्याचे विभाजन करून नेमकं जिल्याच काय विकास होणार आहे. कुठलाही विकासाचा पूर्व आराखडा नसताना आमदारांनी विभाजनाची मागणी करू नये.

विभाजन करणे कसे योग्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात म्हणाले ‘अहमदनगरमध्ये मंत्रींची संख्या आणि प्रभाव जास्त आहे तेथे बराच विकास झाला आहे. पण दक्षिण नगरात नेत्यांना आपले नेतृत्व अजून दाखवता आले नाही त्यांना देखील संधी मिळायला हवी. निधी वाटपावरूनही उत्तर व दक्षिण नेत्यांमध्ये होणार वाद पाहण्याला मिळाला त्यामुळे उत्तर व दक्षिण नांगराला सावित्रीबाई आणि अहिल्या बाई अशी अनुक्रमे नाव द्यावीत’. अहमद नगर पुन्हा राजकारणाचा केंद्र बिंदू बनलेला असून या वादात अहमदनगर जिल्यातील व जिल्याबाहेरील बरेच नेते आपली मत मांडत आहेत. अहमदनगर चे विभाजन हा प्रश्न नेत्यांच्या अस्मितेचा होतोय असे म्हटले जाते.

हे ही वाचा:

Covid 19, चीनमध्ये वाढतोय कोरोनाचा उद्रेक, भारतातील स्थिती घ्या जाणून

पत्रकार दिनानिमित्त जाणून घ्या कोण आहेत बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी महाराष्ट्राला दिले पहिले वृत्तपत्र?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version