कसाबच्या वेळी इतका देखील बंदोबस्त नव्हता

राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांच्या निर्देशानुसार 3 आणि 4 जुलै या दोन दिवसांत विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे.नव्या सरकारच्या स्थापनेनंतर तातडीने बोलावलेल्या या अधिवेशनात अध्यक्षपदी निवडणुका होणार आहेत

कसाबच्या वेळी इतका देखील बंदोबस्त नव्हता

राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांच्या निर्देशानुसार 3 आणि 4 जुलै या दोन दिवसांत विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे.नव्या सरकारच्या स्थापनेनंतर तातडीने बोलावलेल्या या अधिवेशनात अध्यक्षपदी निवडणुका होणार आहेत आणि या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस बंडखोर देखील विधानभवनात दाखल झाले आहेत.त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहिले आहेत.त्यावेळी त्यांनी शिंदें गटासोबतच भाजप वर टीका केली आहे.विधानभवनात जाताना आदित्य जाताना मीडियाशी सवांद साधला आणि शिवसेनेच्या व्हीपबद्दल माहिती दिली.

आणि तसंच त्यांनी विधानभवनातील सुरक्षित बाबत देखील टीका केली आहे.आदित्य ठाकरे म्हणाले की विधान भवनात जास्त सुरक्षा कडक ठेवण्यात आली आहे.माध्यम आणि आमदारांमध्ये दोरी बांधण्यात आली आहे.ही दोरी कधीच एवढी लांब नव्हती.एवढा बंदोबस्त असताना आमदारांना कोणताही प्रकारचा धोका नसताना एवढा बंदोबस्त कशाला? कसाबच्या वेळी सुद्दा एवढा कडेकोट बंदोबस्त नव्हता किंवा एरवी कधीच मुंबईत बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता.यांच्या वक्तव्यामुळे अनेक नेटकऱ्यांना देखील हा प्रश्न पडला आहे.40 बंडखोर आमदार हे बसमधून एकत्र आले.त्यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या कडक बंदोबस्त मुळे रस्त्यावर भरपूर प्रमाणात गर्दी झालेली होती.

Exit mobile version