spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अतीक अहमदच्या मुलाचं महाराष्ट्रसोबत कनेक्शन? खुनानंतर होते नाशिक आणि पुण्यात

उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतीकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने चकमकीत ठार केले.

उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतीकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने चकमकीत ठार केले. दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. झाशी येथे त्यांची चकमक झाली. असद अहमद यांचे महाराष्ट्र सोबत कनेक्शन आहे अशी गंभीर गोष्ट सध्या समोर आली आहे.

असदला दिल्लीतील एका माजी खासदारानं मदत केली होती, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तसेच उमेश पालची हत्या केल्यावर असद आणि त्याचा शार्पशूटर गुलाम नाशिक आणि पुण्यालाही येऊन गेले. येथे त्यांना अबू सालेमच्या गुंडांनी मदतही केली. अबू सालेम आणि अतीक यांची जुनी मैत्री असल्याचं तपासात समोर आलं आहे. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, उमेश पालची यांची हत्या केल्यानंतर असद आणि गुलाम हे बाईकवरून कानपूरला गेले होते. कानपूरहून हे दोघेही रोडवेजच्या बसमध्ये बसले आणि नोएडाला पोहोचला. त्यानंतर ते दोघेही असद नोएडामध्ये ज्या ठिकाणी राहायचा त्या ठिकाणी रहायला गेले. परंतु तेथूनही त्यांनाही नंतर काढता पाय घेतला. नंतर राजस्थानमध्ये त्यांनी त्यांचा मुक्कम केला आणि पुढे ते नाशिक मध्ये आले आणि नंतर पुणे गाठले. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनीही दोघांचा शोध सुरू केला. याची माहिती मिळताच दोघेही दिल्लीला परतले. तीन दिवसांपूर्वी दोघेही अचानक झाशीला आले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असद आणि गुलाम पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा कट रचत होते. त्यासाठी गुड्डूलाही झाशीला यावे लागले.

यूपी पोलीस आणि एसटीएफ गेल्या ५० दिवसांपासून त्याचा शोध घेत होते, त्यासाठी पोलीस सतत त्याचा शोध घेत होते. यूपी पोलिसांच्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, झाशीमध्ये पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्यांना ठार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले, प्रयागराजमधील उमेश पाल हत्याकांडातील हवाला असलेले असद अहमद आणि गुलाम हे प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस असलेले बदमाश होते. झाशी येथे एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत दोघांचा मृत्यू झाला.

कुमार यांनी सांगितले की, चकमकीत सहभागी झालेल्या उत्तर प्रदेश एसटीएफच्या पथकाचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक नवेंदू कुमार आणि विमल कुमार सिंह करत होते. या चकमकीनंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, खोट्या चकमकी करून भाजप सरकार खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. कुमार यांनी नंतर पोलिस मुख्यालयात अतिरिक्त पोलिस महासंचालक (एसटीएफ) अमिताभ यश यांच्यासमवेत पत्रकारांना सांगितले की या कारवाईत दोन पोलिस उपअधीक्षक, दोन निरीक्षक, एक उपनिरीक्षक (एसआय), पाच हेड कॉन्स्टेबल आणि दोन कमांडो सहभागी होते.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, महाविकास आघाडीचे मतभेद समोर येऊ लागल्याने ठाकरे पवारांची महत्त्वपूर्ण बैठक?

‘लोकजागर’च्या माध्यमातून रसिकांसमोर उभा राहिला अवघा महाराष्ट्र, ठाणेकर रसिकांचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss