शिवसैनिकांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

...तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा ही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसैनिकांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

मुंबई : भायखळा येथील दोन शिवसैनिकांवर काही जणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. दोघे गाडीत असताना गाडीवर काही अज्ञातांनी गुरुवारी रात्री साडे अकराच्या आसपास हल्ला केला होता. तिघेजण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यातून दोघे शिवसैनिक सुखरूप बचावले आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हल्ला झालेल्या शिवसैनिकांनी पोलीस संरक्षण दिलं जावं, अशी मागणी करण्यात आली आहे. हल्ल्याची माहिती मिळताच असंख्य शिवसैनिकांनी भायखळा पोलीस स्टेशन गाठलं होतं.

हेही वाचा :

फोटो : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी भायखळामध्ये जाऊन त्या दोन्ही शिवसैनिकांची भेट घेत विचारपूस केली. तसेच जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा ही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी शिवसेना भवनावरील बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील रामभाऊ भोगले मार्गावरील शाखेला भेट दिली. यावेळी त्यांनी हल्ला झालेल्या शिवसैनिकांची विचारपूस केली. भायखळा येथील शिवसेना पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर काही जणांनी गुरुवारी रात्री हल्ला केला होता.

हेही वाचा :

पावसाळ्यात सतत चहा घेऊन ऍसिडिटी वाढतेय ? त्या पेक्षा प्या ही गरमा गरम पेयं

 

यावेळी पोलिसांना उद्धव ठाकरेंनी धारेवर धरलं. यावेळी पोलिसांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘शिवसैनिकांचं रक्त न सांडण्याचं मी आव्हान करतोय. मात्र असं होत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. जीवाशी येत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही. कारवाई झाली पाहिजे. तुम्ही हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करा. आरोपींना तुम्ही चौकशीसाठी का बोलवलं नाही? ‘असं राजकारण कधीच झालं नव्हतं. तुम्ही राजकारणात पडू नका, असं उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सांगितलं.

Exit mobile version