spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे गटाला झटका!, तब्बल १९ जणांना ५ वर्षांची शिक्षा

नांदेड मध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा झटका हा लागला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान वाहनांची तोडफोड केली आहे

नांदेडमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा झटका हा लागला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनादरम्यान वाहनांची तोडफोड केली आहे. ही तोडफोड उद्धव ठाकरे गटाला आता चांगलीच वादात टाकणार आहे कारण वाहनांची तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी महिला आमदार आणि जिल्हा प्रमुखासह तब्बल १९ जणांना नांदेड न्यायालयाने तब्बल ५ वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. नांदेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी मंगळवारी दिनांक ११ एप्रिल रोजी ही शिक्षा सुनावली आहे.

दिनांक ७ जून २००८ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या माजी आमदार अनुसया खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली गेट परिसरात रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko) करण्यात आले होते. या आंदोलनात ठाकरे गटाचे आजी जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, भुजंग पाटील यांच्या अनेक आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले होते. आता या प्रकरणी तब्बल १९ जणांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आणि माजी आमदार अनुसयाबाई खेडकर, महेश खेडकर, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील, नरहरी वाघ, बालाजी शिंदे, नवनाथ भारती, माजी पंचायत समिती सभापती व्यंकोबा रोगडे, भुजंग कावळे, बालगीर गिरी, दौलत पोकळे, बाळू तिडके, शिवाजी सूर्यवंशी, श्रीकांत पाठक, सुभाष शिंदे, भैया शर्मा यांच्यासह ठाकरे गटातून भाजपात गेलेले दिलीप ठाकूर, संदीप छपरवार, मनोज यादव यांना शिक्षा सुनावली आहे.

या दरम्यान महापालिका आणि पोलिसांच्या दोन वाहनासह चार एसटी बसवर दगडफेक देखील करण्यात आली. यात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणि वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल पंधरा वर्ष नांदेडच्या न्यायालयात प्रकरण सुरु होतं. यात जणांची साक्ष नोंदवण्यात आली. अखेर पंधरा वर्षांनंतर न्यायाधीश बांगर यांनी माजी आमदारासह १९ जणांना पाच वर्ष कारावास आणि एक लाख साठ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

हे ही वाचा : 

५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात

Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss