औरंगाबादकरांनो उद्या घराबाहेर पडण्याआधी पहा हे वाहतुकीचे नियम…

मंत्री मंडळाची बैठक उद्या सकाळी औरंगाबाद शहरात होणार आहे.

औरंगाबादकरांनो उद्या घराबाहेर पडण्याआधी पहा हे वाहतुकीचे नियम…

मंत्री मंडळाची बैठक उद्या सकाळी औरंगाबाद शहरात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड (Chief Justice Chandrachud) यांच्या दौऱ्यासह मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त शहरातील १६ रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. मंत्री मंडळाच्या बैठकीमुळे राज्यभरातून विविध आंदोलने आणि मोर्चे येण्याची शक्यता आहे. यामुळे मंत्री मंडळाची बैठक सुरळीत पार पडावी यासाठी औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी वाहतूक मध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांनी उद्या घरा बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल.

औरंगाबाद मध्ये सकाळी सात वाजल्यापासून ते १० वाजे पर्यंत शहानूरमियाँ दर्गा चौक ते सूतगिरणी चौक रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यत भडकल गेट ते अण्णा भाऊ साठे चौक रस्ता पूर्णपणे बंद राहील. सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत गोपाळ टी ते सिल्लेखाना व क्रांती चौक रस्ता बंद रहाणारक्रांती चौक उड्डाणपुलाच्या पूर्व, पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता पूर्णपणे बंद.सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत क्रांती चौक, अजबनगर, बंडू वैद्य चौक, सावरकर चौक, निरालाबाजार, नागेश्वरवाडी, खडकेश्वर टी, सांस्कृतिक मंडळ, ज्युबिली पार्क, भडकल गेट रस्ता बंद करण्यात आला आहे.

औरंगाबाद मधील संग्रामनगर उड्डाणपुलाजवळून शंभूनगर, गादिया विहार ते शिवाजीनगरमार्गे वाहने ये जा करण्यासाठी चालू असणार आहेत. शिवाजीनगर, बारावी योजना मार्ग, गोकूळ स्वीट, जयभवानी चौकमार्गे पुढे जातील व येतील.अण्णा भाऊ साठे चौक, टीव्ही सेंटर चौक, सेंट्रल नाका, सेव्हन हिल्स, क्रांती चौक उड्डाणपुलावरून महावीर चौक, मिल कॉर्नरमार्गे पुढे जातील व येतील.राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मिल कॉर्नरहून यूटर्न घेऊन कार्तिकी चौक, महावीर चौक, क्रांती चौक उड्डाणपुलावरून जळगाव टीमार्गे पुढे जातील व येतील.गोपाळ टी, उत्सव मंगल कार्यालय, काल्डा कॉर्नरमार्गे पुढे जातील व येतील.गोपाळ टी, कोकणवाडी, क्रांतीनगरमार्गे पुढे जातील व येतील.प्रोझोन मॉल, एन-१ चौक, वोक्हार्टमार्गे येतील व जातील.

मंत्रिमंडळाची उद्या बैठक औरंगाबादमध्ये होणार आहे. या बैठकीत औरंगाबाद शहराला काय मिळणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.अनेक वर्षांपासून शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला असून, नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत काही घोषणा होणार का? या सगळ्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच स्थानिक विकासाच्या घोषणा होतील का? हा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा: 

लोअर परळ उड्डाणपुल १८ सप्टेंबर पासून पुन्हा होणार चालू

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version