Badlapur School Case: बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवणार, आरोपीला कठोर शिक्षा होईल, CM Eknath Shinde यांची मोठी प्रतिक्रिया

Badlapur School Case: बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवणार, आरोपीला कठोर शिक्षा होईल, CM Eknath Shinde यांची मोठी प्रतिक्रिया

Badlapur School Case: गेल्या काही दिवसांपासून देशभरातुन आणि राज्यातून महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असून आता बदलापूर शहरातून देखील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर पोलीस आणि शाळा प्रशासनाच्या दिरंगाईवर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शाळेच्या गेटसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात असून पीडित मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे संगीतले आहे. ते यावेळी म्हणाले, “मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. कर्मचारी कामावर ठेवताना पूर्ण चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित संस्थेवरही कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत. या प्रकरणात संस्थाचालकाची चूक असेल तर त्यांचीही चौकशी करायला सांगितले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरही मी कारवाई करण्याचे सांगितले आहे,” असे ते म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेतील चार वर्षे आणि सहा वर्षे वयाच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात असून पीडित मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शाळेच्या गेटसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली .

या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणात चालढकल केल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र, शाळा प्रशासनाने अजूनही पालकांसोबत समोरासमोर कोणतीही चर्चा केलेली नाही. याबाबत शाळा प्रशासन काही बोलायला तयार नसल्यामुळे पालक प्रचंड संतापले आहेत. पालक आणि बदलापूरमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला असून नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे.

हे ही वाचा:

राज्यात होणार पुन्हा मोठी पोलीस भरती! डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदासाठी होणार भरती

नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपट येत्या ६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version