spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Badlapur School Case: घडलेला प्रकार प्रचंड वेदनादायी, त्याहून जास्त पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईचा संताप: Jitendra Awhad

गेल्या काही दिवसांपासून देशभरातुन आणि राज्यातून महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असून आता बदलापूर शहरातून देखील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर पोलीस आणि शाळा प्रशासनाच्या दिरंगाईवर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शाळेच्या गेटसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात असून पीडित मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी शाळेचा गेट तोडून तोडफोड करायला सुरुवात केली आहे. दगडफेकीमुळे आता आंदोलनाने हिंसक वळण घ्यायला सुरुवात झाली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून, “बदलापूरमध्ये घडलेला प्रकार प्रचंड वेदनादायी असून त्याहून जास्त पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईचा संताप..!” असे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आपल्या ४ वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार तिच्या तोंडून ऐकणं आणि गुन्ह्याची नोंद करण्यासाठी १२ तास वाट बघावी लागणं, पालकांसाठी याहून मोठं दुःख काय असू शकतं..?

बदलापूरमध्ये घडलेला प्रकार प्रचंड वेदनादायी आहे, आणि त्याहून जास्त पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईचा संताप..! हल्ली समोर येत असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांची भूमिका पाहून खरं तर आश्चर्य वाटतं आणि डोक्यात सणक जाते. आपलं पोलिस प्रशासन इतकं बेजबाबदारपणे कसं वागू शकतं? मग याचा संताप होऊन लोक का नाही शहर बंद करणार?

महिलांविरोधात घडत असलेल्या घटनांवरून जबाबदारी झटकत आपले सत्ताधारी फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यात मग्न आहेत. फक्त आपली पोळी भाजण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जातोय. पण सशक्त आणि सक्षम धोरण आणून ते राबवण्याची या सरकारची कुवत नाहीये. मोठा भाऊ म्हणत आलेल्या केंद्र सरकारकडून यांनी अजून महाराष्ट्र शक्ती विधेयकही मंजूर करून घेतलं नाहीये.

माझी महामहिम द्रौपदी मुर्मू जी यांना विनंती आहे, की महाराष्ट्र शक्ती विधेयकाला संमती मिळवून द्यावी, जेणेकरून महिलांविरोधातील गुन्ह्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल, आणि राज्यात व देशात अशा गुन्ह्यांविरोधात एक उदाहारण सादर होईल.

नेमके प्रकरण काय?

बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या नामांकित शाळेतील चार वर्षे आणि सहा वर्षे वयाच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात असून पीडित मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शाळेच्या गेटसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली .

या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणात चालढकल केल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र, शाळा प्रशासनाने अजूनही पालकांसोबत समोरासमोर कोणतीही चर्चा केलेली नाही. याबाबत शाळा प्रशासन काही बोलायला तयार नसल्यामुळे पालक प्रचंड संतापले आहेत. पालक आणि बदलापूरमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला असून नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी शाळेचा गेट तोडून तोडफोड करायला सुरुवात केली आहे. दगडफेकीमुळे आता आंदोलनाने हिंसक वळण घ्यायला सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा:

Badlapur School Case: बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवणार, आरोपीला कठोर शिक्षा होईल, CM Eknath Shinde यांची मोठी प्रतिक्रिया

Badlapur School Case: बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार, Chitra Wagh संतप्त

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss