spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Badlapur Student Case: नागरिकांकडून ‘बदलापूर बंद’ ची हाक, संतप्त नागरिकांनी केला ‘रेल रोको’

Badlapur Student Case: गेल्या काही दिवसांपासून देशभरातुन आणि राज्यातून महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असून आता बदलापूर शहरातून देखील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक त्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून शाळेच्या गेटसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात असून पीडित मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणात चालढकल केल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र, यानंतरही पालक आणि बदलापूरमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला असून नागरिकांनी शहरात बंदची हाक दिली आहे.

या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र, शाळा प्रशासनाने अजूनही पालकांसोबत समोरासमोर कोणतीही चर्चा केलेली नाही. याबाबत शाळा प्रशासन काही बोलायला तयार नसल्यामुळे पालक प्रचंड संतापले आहेत. आता शहरातील नागरिकांची साथदेखील मिळाली आहे. आज (मंगळवार, २० ऑगस्ट) शाळेच्या गेटसमोर अनुतप्त नागरिकांचा मोर्चा धडकला. नागरिकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. अजूनही शाळा प्रशासनाकडून कोणीही पालकांना सामोरे गेले नसल्यामुळे नागरिक अजून संतप्त झाले आहेत. या बदलापूर बंद मध्ये रिक्षाचालक, व्यापारी संघटना देखील सहभागी झाले आहेत. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर जाऊन रेल रोको केल्याचे समोर येत आहे.

हे ही वाचा:

राज्यात होणार पुन्हा मोठी पोलीस भरती! डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदासाठी होणार भरती

नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपट येत्या ६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss