दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी, मुंबई पोलिसांचे आदेश जारी

दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी, मुंबई पोलिसांचे आदेश जारी

देशाच्या आर्थिक राजधानीत (मुंबई) पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या सहाय्याने दहशतवादी हल्ले करू शकतात. दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता मुंबईत ड्रोन उड्डाणावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. या इनपुटनंतर सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत.

मुंबईत दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे मुंबईत अलर्ट देण्यात आलाय. दहशतवाद्यांकडून ड्रोन किंवा छोट्या एअरप्लेनने हल्ला होण्याची शक्यता आहे. व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आलीय. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात १२ डिसेंबरपर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट्स, पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर इत्यादी उड्डाण क्षमता असलेल्या संयंत्रे उडवण्यावर बंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर व्भारतीय दंड संहिता कलम १८३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

Sanjay Raut : भाजपनेही भारत जोडो यात्रेचं स्वागत करावं, राऊतांचं आवाहन

आदेशानुसार, असामाजिक घटक, दहशतवादी ड्रोन आणि इतर उडणाऱ्या वस्तूंचा वापर करून जनतेच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करत कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात.अशा घटकांच्या कारवायांना राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाय आवश्यक असल्यामुळे या उपाययोजना करण्यात आल्याचे आदेशात म्हंटले आहे.

अफझल खान कबरप्रकरणाचा वाद सुप्रीम कोर्टात, कबरीभोवतलच्या अतिक्रमणावर सरकारने केलेल्या कारवाईविरोधात याचिका

याआधी ४ नोव्हेंबरला मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका होता. धमकी मिळताच मुंबईच्या तारदेव पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि बॉम्ब शोधक व निकामी पथकाच्या व्हॅनद्वारे संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली, मात्र काहीही सापडले नाही. फोन करणारा अज्ञात होता आणि पोलिसांनी नंतर दावा केला की धमकी देणारा मानसिक आजारी होता.

Raigad Pen : पेणजवळ आढळला डमी बॉम्ब, ४ तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी

Exit mobile version