कोकणातील बारसू प्रकल्पाला येणार वेग

महाराष्ट्रातील बारसू (Barsu) प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोकणातील बारसू मध्ये आता तेल शुद्धीकरणाच्या कामाला पुन्हा वेग येणार आहे.

कोकणातील बारसू प्रकल्पाला येणार वेग

महाराष्ट्रातील बारसू (Barsu) प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोकणातील बारसू मध्ये आता तेल शुद्धीकरणाच्या कामाला पुन्हा वेग येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) राजकुमार मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman Al Saud) यांच्यात सोमवारी यासंदर्भात सहमती झाली. बारसू मध्ये होणाऱ्या ४ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि सौदी अरेबिया मधील मैत्री अजून वाढणार आहे असं पंतप्रधान मोदी (PM Modi) या वेळी म्हणाले आहेत.

रत्नागिरीतील बारसू प्रकल्पामुळे भारत आणि सौदी या दोन राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित होणार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणले आहेत. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे. या बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे. येणाऱ्या वर्षत सौदी अरेबिया भारतात ८. २० लाख कोटीची गुंतवणूक करणार आहेत.

कोकणातील राजापूर मधील नाणार येथील प्रकल्प रद्द झाल्यानंतर आता बारसू सोलगावमधील परिसरात ‘क्रूड ऑइल रिफायनिंग’ कंपनी प्रस्तावित आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील ‘आरामको’ या सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणाऱ्या कंपनीसोबत केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा रिफायनरी प्रकल्प या परिसरात सुमारे १३ हजार एकर जागेवर प्रस्तावित आहे.पण बारसूमधील ग्रामस्थ ही जागा देण्यासाठी तयार नाहीत. आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय, शेती हे व्यवसाय या प्रकल्पातून नष्ट होतील असे गावकऱ्याने मत आहे. हा प्रकल्प प्रदूषित करणारा आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील निसर्गाला, जैवविविधतेला, पर्यावरणाला या प्रकल्पानं बाधा पोहोचेल. त्यामुळे कोकणतील पारंपरिक व्यवसाय, बागा नष्ट होतील, अशी भीती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर पेटले आहे. रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात स्थानिकानी जोरदार विरोध केला आहे.

Exit mobile version