आंघोळीसाठी तळ्यात उतरले, पाण्यात विजेच्या तारा, एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू

आंघोळीसाठी तळ्यात उतरले, पाण्यात विजेच्या तारा, एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चार मुलांची विजेचा शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथे ही घटना घडली. अनिकेत अरूण बर्डै, ओंकार अरुण बर्डै, दर्शन अजित बर्डै व विराज अजित बर्डै या चौघा भावंडांचा मृत्यू झाला आहे. वीज वाहक तार तुटून पाण्यात पडली होती. त्यामुळे ही घटना घडल्याचे समजात ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीविरूद्ध संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळं गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.

विद्युत तारेला चिटकून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या या घटनेनं संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंघोळीसाठी गेलेल्या तळ्यात तुटलेल्या विद्युत तारेच्या झटक्याने ही चारही मुलं दगावली. एकाच कुटुंबातील चौघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घराजवळ असलेल्या तळ्यावर चौघे अंघोळीसाठी गेले होते. वादळी वाऱ्याने तुटलेल्या केबलमध्ये प्रवाह सुरूच असल्यानं ही दुर्दैवी घटना घडली.

पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्यासह साहयक फौजदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पावसामुळे रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे रुग्णावाहिका दूरवरच उभी करावी लागली. तिथपर्यंत झोळी करून मृतदेह न्यावे लागले.चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यूमुळे ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच या घटनेला वीज कंपनीला जबाबदार धरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अचानक घडलेल्या ही घटना पाहून मुलांच्या आई- वडिलांनी हंबरडा फोडला. त्यामुळे उपस्थितांनाही अश्रु अनावर झाले होते.

हे ही वाचा:

आरएसएस इंग्रजांची मदत करत होते; सावरकर यांना इंग्रजांकडून आर्थिक भत्ता मिळत होता – राहुल गांधी

सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती, हे फडणवीसांनी स्पष्ट करावे ; नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version