Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Beed Stone Pelting: Chhagan Bhujbal यांनीच दंगल घडवून आणली, मला १००% खात्री आहे, Manoj Jarange Patil यांचे गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagn Bhujbal) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "छगन भुजबळ यांनीच दंगल घडवून आणली, मला १००% खात्री आहे," असे गंभीर आरोप त्यांनी भुजबळांवर केले आहेत.

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके (Laxman Hake),आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांचा आभार दौरा काल (गुरुवार, २७ जून) रात्री बीड जिल्ह्यातील मातोरी गावातून जाणार होता. पण त्यापूर्वी मातोरी या गावात रात्री काही समाजकंटकाकडून ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाड्यावर अचानक दगडफेक (Beed Stone Pelting) करण्यात आली. मातोरी हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे मुळगाव असून दगडफेकीच्या घटनेमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagn Bhujbal) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “छगन भुजबळ यांनीच दंगल घडवून आणली, मला १००% खात्री आहे,” असे गंभीर आरोप त्यांनी भुजबळांवर केले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले, “छगन भुजबळ यांना दंगल घडवून आणायची आहे. त्याला सवयच लागली आहे. मला १००% खात्री आहे. आधीपासूनच स्वत:च्या गाड्या फोडण्याचा धंदा आहे त्याचा… गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांनी भुजबळचा डाव समजून घ्यावा. छगन भुजबळ हा मस्तीत आलेला माणूस आहे. सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यांवर करतो. ओबीसीच्या नेत्यांना गोळा करून चिथवणीखोर भाषणे द्यायला लावायची. मराठ्यांच्या जातीला आणि मराठ्यांना शिव्या द्यायच्या, हेच ते करतात,” असे ते म्हणाले.

दगडफेकीच्या घटनेवर भाष्य करत ते पुढे म्हणाले,”हे राजकारणी लोक आहेत. छगन भुजबळ दंगल घडवून आणेल आणि परत सत्तेत येऊन बसेल. भोगायला मात्र गोरगरीब ओबीसींना लागेल. मी मराठ्यांना समजून सांगितले आहे कि अजिबात ओबीसींच्या अंगावर जायचे नाही.”

ते पुढे म्हणाले,”ओबीसी बांधवांनो आम्ही तुमचे हक्काचे मागत नाही. ८३ क्रमांकावर २००४ चा जीआर आहे की मराठा व कुणबी एकच आहे. तुम्ही तुमच्या नेत्यांचे ऐकू नका. आरक्षण हे व्यवसायावरून दिलेले आहे. आमच्या हक्काचं आहे आणि आमच्या सरकारी नोंदी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात ठाम व्हा. तुम्ही त्यांच्यांसाठी मराठ्यांचा रोष पत्करू नका. सध्या मुलांच्या अॅडमिशनचे दिवस आहेत, त्यामुळे मुलांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणी निर्माण होत आहेत. मूलींच्या मोफत शिक्षणाचे काय झाले? मी आणि माझा समाज एकटं पडलोय. जो समाजासाठी ईमानदारीनं काम करतो, त्याला समाज कधीच सोडत नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

OBC नेते Laxman Hake यांच्या ताफ्यावर दगडफेक, Beed मध्ये वातावरण तापले

Maharashtra Budget Session 2024: अर्थमंत्री Ajit Pawar करणार राज्याचा अर्थसंकल्प सादर, काय असतील नव्या योजना?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss