भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, उपचारांसाठी त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण
एकनाथ शिंदे तसंच त्यांच्या सोबत असणारे आमदार हे नॉट रीचेबल प्रकणामुळे ह्या प्रकरणाच्या चर्चेला उधाण आलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी या संबंधित मिम्स आणि व्हिडीओज देखील बनवले आहेत. उद्धव ठाकरेंच्य नेतृत्वाखालील सरकार धोक्यात आले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजभवन आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
मात्र राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असतानाच भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, उपचारांसाठी त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यपालांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यपाल कोश्यारींना काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.
त्यामुळे आता राज्यपालांची अनुपस्थिती असेल तर सध्याच्या परिस्थितीत सरकारबाबतचा निर्णय कसा घेतला जाईल, याबाबत चर्चा साधून पुढील हालचाली घडणार आहेत. गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याकडे महाराष्ट्राचा कारभार काही काळासाठी सांभाळण्यासाठी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यात मंत्री एकनाथ शिंदे गोव्याला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. तर आता कालपासून एकनाथ शिंदे सुरत, आसाम येथे असल्याची शक्यता होती पण आता गोवा देखील राजकारण घडामोडींचं केंद्र बनणार का हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र गोवा हे महाराष्ट्रपेक्षा जास्त सुरक्षित आहे असं जाणकाऱ्यांनी सांगितले आहे.
Exit mobile version