Anganewadi च्या भराडी देवीची यात्रेची तारीख ठरली!

संपूर्ण कोकणवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणारी आंगणेवाडीच्या भराडीदेवीची (Anganewadi Bharadi Devi) सर्वत्र ख्याती आहे.

Anganewadi च्या भराडी देवीची यात्रेची तारीख ठरली!

Anganewadi Bharadi Devi Jatra : संपूर्ण कोकणवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणारी आंगणेवाडीच्या भराडीदेवीची (Anganewadi Bharadi Devi) सर्वत्र ख्याती आहे. कोकणातील (Konkan) प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या आंगणेवाडीच्या (AanganeWadi) भराडी देवीची (Bharadi Devi) यात्रा दिनांक २ मार्च २०२४ ला होत आहे. आंगणेवाडीची ही जत्रा म्हणजे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे. कोकणवासीय या यात्रेची अगदी आतुरतेने वाट बघत असतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे म्हणून एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत ‘भराडी देवी’ विराजमान झालेली आहे. इथे भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव ‘भराडी देवी’ असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं. संपूर्ण कोकणवासी त्याच सोबत मुंबईत राहणारे चाकरमानी या आंगणेवाडीच्या जत्रेची आतुरतेने वाट बघत असतात. तर मुंबईसह संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच गोवा व कर्नाटकमधील भाविकही मालवणमधील भराडी देवीच्या जत्रेला येतात. देवीच्या दर्शनासाठी अगदी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. महाराष्ट्रातले अनेक राजकिय नेते, मराठी अभिनेते, अभिनेत्री या यात्रोत्सवासाठी आवर्जून हजेरी लावतात.

दिनांक २ मार्च २०२४ रोजी आंगणेवाडीच्या (AanganeWadi) भराडी देवीची (Bharadi Devi) यात्रा असणार आहे. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आहे. त्यामुळे या यात्रेच्या दिवशी दरवर्षी सुमारे ५ ते ७ लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो. तर नुकतीच आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाली आहे. त्यामुळे आता रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठी चढाओढ लागली आहे. तर जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्या नंतर श्री देवी भराडी मंदिर आज २६ ते २८ डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.

हे ही वाचा:

सनी लिओनी बनली गरजू मुलांसाठी सांता,गिफ्ट देत साजरा केला खास पद्धतीत ख्रिसमस

बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘डंकी’ ची निराशाच,कमाईत अपयशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version