NCB ची मोठी कारवाई! NCB कडून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश; १२० कोटींचं मेफेड्रोन जप्त

NCB ची मोठी कारवाई! NCB कडून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश; १२० कोटींचं मेफेड्रोन जप्त

अंमलीपदार्थाच्या गोदामावर कारवाई करून ५० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात अंमलीपदार्थ नियत्रण विभागाला (एनसीबी) यश आले आहे. याप्रकरणी गुजरातमधूनही १० किलो एमडी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत १२० कोटी रुपये आहे. याप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे. एनसीबीने याप्रकरणी माजी वैमानिक सोहेल गफ्फार याच्यासह दोघांना अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचे नाव मुथ्थू असून त्याला यापूर्वीही अटक करण्यात आली आहे. हे दोघेही केरळ आणि गुजरातमधील रहिवासी असून जप्त केलेले अंमलीपदार्थ फोर्टमधील कबुतरखाना परिसरातील गोदामात सापडले.

सुरुवातीला गुजरातच्या नेव्हल इंटेलिजन्सने काही लोकांच्या संशयास्पद हालचालींबद्दल माहिती शेअर केली होती. त्यानंतर, एनसीबीने मिळालेल्या माहितीच्या आधारे नेव्हल इंटेलिजन्सच्या समन्वयाने काम करण्यास सुरुवात केली. विविध पैलूंचे बारकाईने निरीक्षण केले आणि अतिरिक्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. उच्च दर्जाच्या ड्रग्जची मोठ्या प्रमाणात खेप गुजरातमधून इतर राज्यात नेली जाणार आहे असल्याचं समजलं. एनसीबीने तात्काळ अॅक्शन प्लॅन आखला. ३ ऑक्टोबर रोजी चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १०.३५० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आलं. यापैकी भास्कर व्ही याला गुजरातच्या जामनगरमधून तर एस. जी. महिदा, एस.एम. चौधरी आणि मुथू पी.डी. यांना मुंबईतून अटक करण्यात आली.

चौघांच्या चौकशीतून, तसंच तपासातून अनेक खुलासे झाले. ड्रग्जची तस्करी मुंबईतून होत असल्याचं समोर आलं. त्यानुसार, एनसीबीला संबंधित घडामोडींबाबत सतर्क करण्यात आलं आणि ओळख पटलेल्या तस्करांवर पाळत ठेवण्यात आली. तस्कराने अंमली पदार्थांची तस्कर करण्यासाठी हालचाली करताच एनसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. प्राथमिक चौकशी आणि कारवाईनंतर ६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील फोर्ट परिसरातील एसबी पथ इथे असलेल्या गोदामातून सुमारे ५० किलो एमडी जप्त करण्यात आलं. तपासाअंती एम आय अली आणि एम एफ चिस्ती या मुंबईत दोन व्यक्तींना अटक करण्यात आली.

मेफेड्रोन म्हणजे काय?

MD अर्थात ​​मेफेड्रोन हे उत्तेजक द्रव्य असून सामान्यतः बेकायदेशीर ड्रग्ज बाजारपेठेत म्याऊ म्याऊ किंवा एम-कॅट या नावाने ओळखलं जातं. जे लोक याची नशा करतात त्यांच्यामध्ये या ड्रगसाठी अनेक कोड प्रचलित आहे. खरंतर नशा करणाऱ्यांमध्ये कोकेन आणि हेरॉईनपेक्षा मेफेड्रोनला जास्त महत्त्व आहे कारण याची नशा मोठ्या प्रमाणात चढते.

हे ही वाचा:

८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस, वीज कोसळून दीड एकर ऊस जळून खाक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version