मोठी बातमी!, मुख्यमंत्री शिंदेंना उडवण्याची धमकी

मुख्यमंत्री शिंदेंना उडवण्याची धमकी, ११२ हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून धमकी

मोठी बातमी!, मुख्यमंत्री शिंदेंना उडवण्याची धमकी

सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना उडवण्याची धमकी ही आली आहे. तसेच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात धमक्यांचं सत्र हे सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते (BJP) नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकीचा फोन आला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही धमकीचा फोन आला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी आली आहे. त्यांना उडवून टाकण्याची धमकी देणार फोन मुंबई पोलिसांना आला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे असा कॉल आला त्यामुळे या कॉलनंतर पोलीस सतर्क झाले. कॉल कुठून आला होता याचं लोकेशन त्यांनी ट्रेस केलं. पोलिसांना मिळालेल्या लोकेशननुसार पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतलं.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज धमकी देणारा फोन करण्यात आला होता. ११२ या नंबरवर हा कॉल करण्यात आला होता. त्यावेळेस ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’ असं बोलून त्या कॉलरने कॉल कट केला. दरम्यान या कॉल नंतर हा कॉल नक्की कुठून आला होता याचं लोकेशन पोलिसांनी ट्रेस केलं आणि पोलिसांना मिळालेल्या लोकेशननुसार पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतलं.पुण्यातील (Pune) वारजे इथून हा कॉल आल्याचं लोकेशनद्वारे स्पष्ट झालं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांना धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीने मद्य प्राशन करून नशेत फोन केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपीची बायको पुणे येथील धायरी येथे वास्तव्यास आहे. कौटुंबिक वादातून त्याने हा कॉल केला असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. मारुती आगवणे असं आरोपीचे नाव आहे. २ वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झालेला असून मुलबाळ नाही. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असे त्याची पत्नी व ओळखीचे लोक फोन केल्यावर सांगत आहेत.

सोमवारी दिनांक १० एप्रिल रोजी रात्री ११२ या क्रमांकावर हा फोन आला ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. डायल ११२ चं कंट्रोल रुम नागपूरमध्ये आहे, तिथेच हा कॉल आला होता. तसेच नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणून ११२ हा क्रमांक राज्यात कार्यान्वित करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

नवनीत राणांच्या टीकेवर मनीषा कायंदे यांचे प्रत्युत्तर…

जागतिक आरोग्य संघटनेचा ७५ वा जागतिक आरोग्य दिन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार,आमदारांचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version