ST महामंडळाचा मोठा निर्णय, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल थेट आगारप्रमुखांना फोन

एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आणि अखेर जास्त तक्रारी प्राप्त झाल्यावर एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना तक्रारी नोंदवण्यासाठी प्रत्येक बसमध्ये ती बस ज्या आगाराची आहे त्या आगार प्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. 

ST महामंडळाचा मोठा निर्णय, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल थेट आगारप्रमुखांना फोन

एसटी महामंडळाने बेजबाबदार वागणूक वाहनचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत असेल, गाडी चालवताना फोनवर बोलत असेल अशा वाहनचालकांवर आता कारवाई होणार आहे. गाडी चालवताना कानात हेडफोन घालून गाणी ऐकता येणार नाही. तसेच गाडी चालवताना व्हिडीओ पाहण्यासाठी प्रतिबंध असणार आहे. अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून एसटी महामंडळाकडे येतात. याबाबतच्या तक्रारी वाढत असल्याने एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आणि अखेर जास्त तक्रारी प्राप्त झाल्यावर एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना तक्रारी नोंदवण्यासाठी प्रत्येक बसमध्ये ती बस ज्या आगाराची आहे त्या आगार प्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.

दररोज लाखो नागरिक एसटीने प्रवास करत असतात एसटीला प्रवाशांकडून प्रचंड महसूलही मिळतो. पण ज्या एसटीने प्रवासी प्रवास करत असतात त्यांना पैसे मोजूनही जीवाची भीती वाटत असेल तर असा प्रवास न करणेच बरे. काही वाहन चालकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे एसटी महामंडळाने अशा वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उचलल्यामुळे अशा होणाऱ्या घटनांना अखेर आळा बसण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करून माहिती देण्यात आली आहे. “एसटी बस चालवत असताना भ्रमणध्वनीवर बोलणे अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानुसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत”, असं एसटी महामंडळाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसमोर प्रश्न असतो तो अशा घटनांची तक्रार कुठे करायची? यापूर्वी एसटी बसेसमध्ये संबंधित आगाराचा व स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध केला जायचा, परंतु काही काळाने हे नंबर दिसेनासे झाले. त्यामुळे एसटीच्या प्रवासामध्ये काही समस्या अथवा अडचण आल्यास त्यासाठी दाद कोणाकडे मागायची? हा एक मोठा प्रश्न प्रवाशांसमोर होता. त्यामुळे त्यांच्याच सूचनेनुसार एसटी महामंडळाने आता प्रत्येक बसमध्ये ती बस ज्या आगाराची आहे त्या आगार प्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. प्रवासादरम्यान जर प्रवाशाला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागले तर त्या समस्येचे किंवा तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान त्यांना एखादी असचं आल्यास थेट प्रदर्शित केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपली अडचणीत अथवा समस्येचे निवारण तातडीने करून घ्यावे.

हे ही वाचा:

सीबीटीसी यंत्रणेमुळे प्रवाशांना दिलासा; दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन धावणार

गणपती विसर्जननिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल, १७ रस्ते वाहतुकीस बंद

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version