साखरेच्या दरात मोठी वाढ

जगभरात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या वाढत्या महागाईचा परिणाम सर्वसामन्य जनतेला मोठ्या प्रमाणावर होत आहे.

साखरेच्या दरात मोठी वाढ

जगभरात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या वाढत्या महागाईचा परिणाम सर्वसामन्य जनतेला मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही दिवसांपूर्वी डाळीच्या भावात वाढ झाल्यानंतर आता साखरेच्या (sugar) दरात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या साखरेचे दर ३७ हजार ७६० रुपये प्रति टन पर्यंत वाढले आहेत . २०१७ ऑक्टोबर नंतरचा हा वाढता दर आहे. साखरेच्या दारात वाढ झाल्यामुळे सर्वच व्यापारी आणि उत्पादक चिंतेत पडले आहेत. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकचा नंबर लागतो. पण यावर्षी या दोन्ही राज्यात खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे.

ऊसाच्या पिकात घट झाल्यामुळे साखरेचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. यांचा परिणाम खाद्यपदार्थांवर होऊ शकतो. साखरेचे निर्यात दर असेच वाढत राहिले तर किरकोळ बाजारात साखर महाग होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे भाव वाढल्यामुळे सगळ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. साखरेचासाठा कमी होत असल्याने येत्या काही महिन्यात साखर पुन्हा महागण्याची शक्यता आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सरकार गेल्याकाही महिन्यांपासून शेतमालाचे दर कमी करण्यासाठी निर्णय घेत आहे. याचा फटका कांदा, टोमॅटो, तांदूळ या शेती पिकांना बसत आहे. तर साखरेचे भाव पाडण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.

२०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) साखरेची किंमत २५ टक्क्यांनी वाढली होती. या वाढीनंतर देशातील सरासरी किरकोळ बाजारातील किंमत ४३.३० रुपये इतकी होती. सध्या बाजारात साखरेची किंमत ४३ रुपये एवढी आहे. गेल्या दहा वर्षांत साखरेच्या दरात २ टक्क्यापेक्षा कमी महागाई वाढली असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. दरम्यान भारतात ३३० लाख मेट्रीक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तर साखरेचा देशांतर्गत खप सुमारे २७५ लाख मेट्रीक टन राहण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा: 

अजित पवार करणार पुण्यात शक्तिप्रदर्शन

शरद पवार उतरणार स्वतः मैदानात , करणार उमेदवारांचा चाचपणी

राज्यभरात दहीहंडी उत्सव जोशात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version