सोन्याच्या दरात मोठी वाढ, जळगावात एका दिवसांत सोन्याच्या दरात एक हजाराने वाढ

मागील पंधरा दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावात सोन्याच्या दरात आता एक हजार रुपयाची वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात मोठी वाढ, जळगावात एका दिवसांत सोन्याच्या दरात एक हजाराने वाढ

मागील पंधरा दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावात सोन्याच्या दरात आता एक हजार रुपयाची वाढ झाली आहे. तसेच गेल्या पंधरा दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण झाली होती पण आता ऐन पितृपक्षात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. दहा दिवसात सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. पितृपक्षात सोन खरेदीसाठी ग्राहक मोठी गर्दी करतात.

गेल्या चोवीस तासापासून पऍलेस्टाईन आणि इस्त्राईल (Israel Palestine Conflict) या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाचा परिमाण सोन्याच्या दरावर झाला आहे. एका रात्रीमध्ये गुंतवणूक दरांनी सोन्याच्या दरात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तसेच अनेक ग्राहकांनी सोने खरेदी बाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे जळगावात दिसून आले आहे. शनिवार पर्यंत सोन्याचे दर कमी आल्यामुळे सोन्याच्या दुकानात गर्दी झाली होती. मात्र आता ती गर्दी कमी झाली आहे. सोन्याच्या या वाढलेल्या दरामुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे.

इस्रायलमधील युद्धानंतर सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तसेच आता भारतामध्ये सणासुदीला सुरुवात होणार आहे. या परिस्थिती सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासुन सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली होती. तसेच अनेक दुकानदार आणि गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले होते. सरीकडं सोन्याची मागणी लक्षात घेता डीलर्स सध्या सोने-चांदीची विक्री करू इच्छित नाहीत. पुढील महिन्यांपासून लग्नसराई, सण समारंभाला सुरुवात होणार आहे. पण वाढत्या सोन्याच्या भावामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

हे ही वाचा: 

पिंपरी चिंचवडमध्ये एकापाठोपाठ नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, ३ स्कूल बस जळाल्या

‘धक धक’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version