नाशिकरांसाठी मोठी बातमी

नाशिक (Nashik) शहर आणि जिह्ल्यात आज सकाळी ११ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत रिक्षा आणि टँक्सी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकरांसाठी मोठी बातमी

नाशिक (Nashik) शहर आणि जिह्ल्यात आज सकाळी ११ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत रिक्षा आणि टँक्सी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक शहरातील नागरीक आणि विद्यार्थ्यांनचे मोठे हाल होणार आहेत. नाशिक शहर आणि जिह्ल्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या विविध मागण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस- महापालिकेस वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने शहरातील आणि जिह्ल्यातील चालकांनी आंदोलन करण्याचे ठरवले आहे. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहे. त्यामुळे नाशिक शहरात मंगळवारी ११ वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. हा निर्णय श्रमिक रिक्षा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

नाशिकमधील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या विविध मागण्या वारंवार सांगून सुद्धा पूर्ण न झाल्यामुळे चालकांनी धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे. सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती श्रमिक सेनेचे महानगरप्रमुख मामासाहेब राजवाडे यांनी दिली. नाशिक शहरातील रिक्ष आणि टॅक्सी चालकांच्या विविध मागण्यासाठी २१ जुलै रोजी लेखी निवेदन सादर केले होते. पण त्यातील कोणत्याही मागण्या अजून पूर्ण न झाल्यामुळे आज चालकांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमिक सेनेचे संस्थापक सुनील बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्याध्यक्ष भगवान पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, बाबासाहेब राजवाडे, शंकर बागुल, नवाज सय्यद, राजेंद्र वाघलेआणि नाशिक मधील सर्व रिक्षा, टेम्पो आणि टॅक्सी चालक उपस्थित राहणार आहेत.

रिक्षा चालकांनी पुकारलेल्या या धरणे आंदोलनामुळे विध्यार्थी आणि नागरिकांचे हाल होत आहेत. श्रमिक सेनेकडून या मागण्या पूर्ण करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. या मध्ये म्हंटले आहे ‘ नाशिक मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिकेकडून शहरात सिटीलिंक बससेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांचा रोजगार हिसकावला गेला आहे. शहरातील या बससेवेमुळे सुमारे २३००० रिक्षा, टॅक्सी चालकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. म्हणून सिटीलिंक बससेवेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. सिटीलिंक चालविण्यासाठी खर्च करण्यात येणारा पैसा हा नाशिकमधील रहिवाशांच्या करातून करण्यात येतो, परंतु त्याचा फायदा महानगरपालिकबाहेरील गावांना होत आहे.

हे ही वाचा: 

सरकारच्या शिष्ठमंडळासोबत संभाजी भिडेही मनोज जरांगेंच्या भेटीला 

मनोज जरांगेंनी मांडली स्पष्ट भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version