मोठी बातमी! आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर, ‘टाईम महाराष्ट्र’ने आधीच दिल होत वृत्त

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात येणार हि बातमी काही दिवसांपूर्वी सर्वात टाईम महाराष्ट्र या चॅनेल द्वारे सांगण्यात आली होती.

मोठी बातमी! आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर, ‘टाईम महाराष्ट्र’ने आधीच दिल होत वृत्त

आताच्या घडीची सर्वात मोठी आणि गौरवाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार आज दत्तात्रय नारायण धर्माधिकारी तथा आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना घोषित झाला आहे. याबाबतचे वृत्त सर्वात आधी ‘टाईम महाराष्ट्र’ने दिले होते.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आध्यात्मिक, शिक्षण आणि पर्यावरण तसेच व्यसनमुक्ती साठी चाळीस वर्ष कार्य केले आहे. देशातील नामवंत निरूपणकार म्हणून त्यांचा जगभर लौकिक आहे. अलिबाग येथील रेवदांड्याच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

हे ही वाचा : Time Maharashtra Exclusive, मोठी बातमी; आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण!

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही आप्पासाहेबांची भेटही घेतली.

१४ मे १९४६ रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात.

रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी १९४३ सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने २०१७ मध्ये सन्मानित करण्यात आले होते. तसेच २०१४ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. संपूर्ण देशासह, पाकिस्तान, यूएई, लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया, इराण या सारख्या अनेक देशांमध्ये या संप्रदायाचे शिष्य हे सर्वदूर पसरलेले आहेत. या वर्षीचा पदमविभूषण (Padma Vibhushan) हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी याना मिळू शकला न्हवता. त्यामुळे त्याच्या बैठकीतील नागरिक, कार्यकर्ते यांना हुरहूर लागली होती. आणि तीच हुरहूर महाराष्ट्र सरकारने दूर करण्याचा निर्णय हा घेतला. तसेच सोमवार दि. ३० जानेवारी रोजी रायगडचे जिल्हाधिकारी यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली होती. आणि सरकारच्या डोक्यात काय आहे हे त्यांनी त्यांना सांगितले होते.

हे ही वाचा : Appasaheb Dharmadhikari कोण आहेत ? घ्या जाणून

१९९६ मध्ये प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९९६ मध्ये पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे याना प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच आता पर्यंत अशी दोन कुटुंब आहेत ज्यांना एका कुटुंबातील २ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे , मंगेशकर कुटुंब (Mangeshkar family). १९९७ साली गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) याना हा पुरस्कार मिळाला होता तर २०२० साली आशा भोसले (Asha Bhosle) यांना देखील पुरस्कारदेण्यात आला होता. तसेच २००३ साली अभय बंग आणि राणी बंग याना देण्यात आला होता. आणि त्यानंतर २००८ साली नानासाहेब धर्माधिकारी याना हा पुरस्कार देण्यात आला होता. तर आता २०२२ चा पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

Uddhav Thackeray Live, उद्धव ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, उद्योगपतीही पंतप्रधान-मुख्यमंत्री होतील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version