spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी! पुन्हा एकदा हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा ईडीचे छापे

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Nationalist Congress leader Hasan Mushrif) यांच्या कागल येथील घरावर ईडीकडून आज पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Nationalist Congress leader Hasan Mushrif) यांच्या कागल (Kagal) येथील घरावर ईडीकडून (ED) आज पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. सलग दुसऱ्यांदा ही छापेमारी करण्यात येत आहे. आज सकाळी पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या निवास्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. यापूर्वी ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील नातेवाईकांच्या निवासस्थानी तसेच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यालयात इडीच्या पथकाने छापा टाकला होता. त्या वेळी ‘ईडी’च्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली होती.

आज सकाळी अचानक हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी कडून छापेमारी करण्यात आली त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहेत. तसेच दीड महिन्यात सलग दुसऱ्यांदा दि छापेमारी करण्यात आली आहे. ईडीकडून साखर कारखान्याशी संबंधित कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं होतं. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित ४० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच आज संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. कोलकात्यातील बोगसकंपन्यांमधून १५८ कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. तसेच या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली होती.

Latest Posts

Don't Miss