मोठी बातमी! वांद्र्यात लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्याला बेड्या

हे आरोपी सातत्याने एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते.

मोठी बातमी! वांद्र्यात लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्याला बेड्या

मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. दहशदवादी मुंबईत एक मोठा दहशदवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहेत संशय सुरक्षा यंत्रणांना होता आणि त्यातच बंगालच्या दहशतवादी विरोधी पथकाने महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने एका संशयित जिहादीला ताब्यात घेतलं आहे. एटीएसने मुंबईच्या वांद्रे येथून संशियत जिहादीला बेड्या ठोकल्या आहेत. हा संशयित आरोपी एका दहशतावादी संघटनेच्या संपर्कात होता अशी माहितीसुद्धा आता समोर येत आहे.

पश्चिम बंगाल एटीएसला माहिती मिळाली होती की, एक संशयित जिहादी मुंबईत लपून बसलेला आहे. त्यानंतर बंगालच्या एटीएसने महाराष्ट्र एटीएससोबत समन्वय साधला. बंगाल एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने वांद्र्यातील निर्मल नगर भागातून सद्दाम हुसैन खान नावाच्या 34 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं. पश्चिम बंगाल पोलिसांनी आणखी एका जिहादीला अटक केली आहे. त्याला डायमंड हार्बर येथून अटक करण्यात आली आहे. दोन्ही संशयित जिहादी आहेत.

या प्रकरणी बंगाल पोलिसांचा तपास सुरु आहे. याशिवाय बंगालच्या तपास यंत्रणादेखील युद्ध पातळीवर तपास करत आहेत. हे संशयित आरोपी आणखी कुणाकुणाच्या संपर्कात होते याचा तपास सुरु आहे. या आरोपींचा काही घातपात घडवण्याचा कट होता का? याचा तपास सुरु आहे. पण मुंबईत संशयित जिहादीला पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे.अटक करण्यात आलेल्या दोघांवर गंभीर आरोप आहेत. हे आरोपी सातत्याने एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते.

हे ही वाचा:

सीएम एकनाथ शिंदेंचे राज्यपालांना पत्र,१२ एमएलसी जागांसाठी ठाकरेंची यादी फेटाळण्याची मागणी

उद्धव ठाकरे करणार कमबॅक? ४ आमदार बाहेर पडले तर शिंदे सरकारचे होणार नुकसान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version