spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘देवदूत बस घोटाळाप्रकरणी’ मोठा खुलासा, लाखांची बस केली करोडोत खरेदी, फडणवीसांनी घेतली दाखल

कोरोना काळात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था फार बिकट झाली होती. याच पार्शवभूमीवर राज्यसरकारने मदत व पुनर्वसन विभागाने काही निर्णय घेतले मात्र आता याच निर्णयांमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याच समोर येत आहे.

कोरोना काळात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था फार बिकट झाली होती. याच पार्शवभूमीवर राज्यसरकारने मदत व पुनर्वसन विभागाने काही निर्णय घेतले मात्र आता याच निर्णयांमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याच समोर येत आहे. वित्त विभागाचा विरोध असतानाही या विभागाने शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. बाजारभावाप्रमाणे याची २५ ते ३० लाखांची मूळ किंमत आहे. पण प्रसिद्ध वृत्तवाहिनी एबीपी माझाने या पराक्रमाचा उलघडा केलं आहे. हे वाहन आणि त्याचे साहित्य तब्बल या विभागाने तीन कोटीच्या घरात खरेदी केल्याचा प्रताप या विभागाने केलाय. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच समोर आले आहे.

राज्यात कधी नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती आली तर अशा वेळी तातडीनं मदत पोहोचवण्यासाठी शीघ्र प्रतिसाद या विशेष वाहनाची योजना आणली. मात्र राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने खरेदी केलेल्या शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती वृत्तवाहिनी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. २५ ते ३० लाख रुपये किंमत असलेली शिघ्र प्रतिसाद वाहनांची खरेदी तब्बल एक कोटी ९४ लाखात केली आहे. मेंटेनन्ससह ही एक गाडी तीन कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचे पुरावे समोर येत आहे.

या वाहन खरेदीला तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा वारंवार विभागाशी पत्रव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. कोविड काळात एवढ्या मोठ्या खरेदीला वित्त विभागाने नकार दिल्यानंतर तत्कालीन या विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विशेष बाब म्हणून तात्काळ विभागाला पत्र काढून हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या विभागाने मंत्र्यांच्या विशेष बाब शिफारशीनंतर या प्रस्तावाला मंजुरी देत या गाड्यांची केली खरेदी होती. परंतु आता हा आर्थिक घोटाळा समोर आल्यामुळे जनते समोर प्रश्न निर्माण झाले आहेत.

हा संपूर्ण घोटाळ्यात कंपनीच नाही तर याचे धागेदोरे हे वरपर्यंत पोहोचताना असल्याचे निष्पन्नास आले आहे. त्यामुळे कोविड काळात मदत व पुनर्वसन विभागाने नेमकी कोणाला मदत केली आणि कोणाचं पुनर्वसन केलं याची चौकशी होणार का? हे येत्या काळात पाहणे महत्वाचे ठरेल.

हे ही वाचा:

सर्वसामान्यांसाठी एक सुखद बातमी, केंद्र सरकारची रेशन बाबत मोठी घोषणा

अनिल देशमुकांची जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, पण …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss