BJP ने जाहीर केले विधान परिषदेचे पाच उमेदवार, Pankaja Munde, Sadabhau Khot यांच्यासह मिळाली नवीन चेहऱ्यांना संधी!

BJP ने जाहीर केले विधान परिषदेचे पाच उमेदवार, Pankaja Munde, Sadabhau Khot यांच्यासह मिळाली नवीन चेहऱ्यांना संधी!

राज्यात होणाऱ्या आगामी विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election 2024) ११ जागांसाठी निवडणुका होणार असून भाजपकडून (BJP) आता पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने विधानपरिषदेसाठी पाच नावांची घोषणा केली असून त्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाचा देखील समावेश आहे. पंकजा मुंडे यांच्यासह शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनादेखील भाजपतर्फे संधी देण्यात आली आहे. या दोघांसह भाजपने आणखी तिघांच्या नावांची विधानपरिषदेसाठी घोषणा केली आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तसेच त्याच दिवशी निकालही स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना देखील भाजपने संधी दिली आहे. यासह परिणय फुके (Parinay Fuke) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे नाव विधानपरिषदेसाठी निश्चित करण्यात आले आहे. यासोबतच अमित गोरखे (Amit Gorkhe) यांचे नावदेखील घोषित केले गेले आहे.

यंदा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. निकालही त्याच दिवशी जाहीर होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने ११ नावांची यादी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. आगामी विधानसभा निवडणुका आणि राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून भाजप पक्षाच्या दिग्गजांनी यापैकी ५नावांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पंकजा मुंडे अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा सभागृहात दिसणार आहेत. पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेची उमेदवारी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे.

हे ही वाचा:

Maharashtra Monsoon Assembly 2024: ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार, Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Lonavala Bhushi Dam Tragedy: पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या उपाययोजना काय?: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version