spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नागपूर-अमरावती रोडजवळील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू

नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे एका कंपनीला आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे एका कंपनीला आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. तसेच यामध्ये अनेक मजूर गंभीर रित्या जखमी झाले आहेत. नागपूर अमरावती रोडवरील (Nagpur Amravati Road) सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकर बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी होती. आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचा काम सुरू असताना हा स्फोट झाला आहे. हा स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहेत. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला आहे .मात्र पोलीस किंवा प्रशासनाकडून त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. सोलार एक्सप्लोजिव्ह या कंपनीच्या मुख्य दारासमोर मोठ्या संख्येने कामगारांचे नातेवाईक जमले आहे.

हे ही वाचा:

अभिनेत्री रुबीना दिलैकच्या घरी आल्या लक्ष्मी,दिला दोन जुळ्या मुलींना जन्म

इडलीसोबत ट्राय करा साऊथ इंडीयन स्टाईल स्पेशल चटणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss