जुहु समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांना ‘ब्लू बॉटल जेलिफिश’ चा धोका

जुहू चौपाटीवर दररोज खूप मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात पण, ब्लू बॉटल जेलिफिशमुळे पर्यटकांमध्ये अगदी घबराटीचे वातावरण पसरले आहे. पर्यटकांनी चौपाटीवर अनवाणी फिरू नये, असे आवाहन जीवनरक्षकांनी पर्यटकांना केले आहे.

जुहु समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांना ‘ब्लू बॉटल जेलिफिश’ चा धोका

गेल्या तीन – चार दिवसांपासून जुहू चौपाटीवर ब्लू बॉटल जेलिफिशचा धोका वाढू लागला आहे. जुहू चौपाटीवर दररोज खूप मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात पण, ब्लू बॉटल जेलिफिशमुळे पर्यटकांमध्ये अगदी घबराटीचे वातावरण पसरले आहे. पर्यटकांनी चौपाटीवर अनवाणी फिरू नये, असे आवाहन जीवनरक्षकांनी पर्यटकांना केले आहे.

ब्लू बॉटल जेलिफिश म्हणजे नक्की काय?

वजनाने हलके असल्यामुळे ब्लू बॉटल जेलिफिश हे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. हवा भरलेल्या निळ्या पिशवीसारखा या जेलीफिशचा आकार असून, ‘पोर्तुगीज मॅन ओ वॉर’ या नावानेही तो ओळखला जातो. तसेच हा जेलीफिश विषारी असल्यामुळे तिचा लोकांना धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईच्या किनाऱ्यालगत एकूण तीन प्रकाचे जेलीफिश आढळतात. पावसाळ्यापूर्वी ‘ब्लू बटन’, पावसाळ्यात ‘ब्लू बॉटल’ आणि पावसाळ्यानंतर ‘बॉक्स’ अशाप्रकारे हे जेलीफिश किनाऱ्यालगत दिसून येतात. या तिन्ही प्रकारांपैकी ब्लू बटन हा जेलीफिश विषारी समजला जातो आणि ब्लू बॉटलने माणसाला दंश केल्यावर त्याच्या पेशींमधील ‘टेंटॅकल्स’ या द्रव्यामुळे माणसाला फार वेदना होतात. त्यामुळे कुणीही चौपाटीवर अनवाणी फिरू नये, असे आवाहन लोकांना करण्यात येत आहे.

 

Exit mobile version