मनपाचा प्रयोग यशस्वी, मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यामार्फत पाण्याचा निचरा

शहर विभागात विशेषतः दादर, हिंदमाता व गांधी मार्केट या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचून राहिले होते.

मनपाचा प्रयोग यशस्वी, मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यामार्फत पाण्याचा निचरा

मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यामार्फत पाण्याचा निचरा

मुंबई : शहर विभागात विशेषतः दादर, हिंदमाता व गांधी मार्केट या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचून राहिले होते. दादर व वरळी व आजूबाजूच्या परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.याबद्दल भाजप व काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली होती तासाला 50 मीमी लागणाऱ्या पावसाचे पाणी वाहून येण्याचे पर्जन्य जल वाहण्याची क्षमता असणारी पालिका नेमकी कुठे अयशस्वी ठरली आहे हे भाजप व काँग्रेसचे काही नेते मंडळी दाखवून देत होते.

परंतु आज संपूर्ण दिवसभरात हिंदमाता व गांधी मार्केट या परिसरामध्ये साचलेले पाणी तासाभरात पर्जन्य जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाण्याचा निचरा करण्यात आलेला आहे. शिवसेना नेता किशोरी पेडणेकर यांनी या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेचा हा प्रकल्प यशस्वी ठरताना दिसून येतोय. मुंबईची दरवर्षी मुंबई होते हे निश्चितच असते परंतु यंदाच्या वर्षी साचलेला पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे.

 हेही वाचा:

राज ठाकरेंच्या भेटीबाबत; सदा सरवणकर यांनी कारण स्पष्ट केले

पर्जन्य जलवाहिनीची जाणून घ्या भौगोलिक रचना

पर्जन्य जलवाहिनीचे जाळे हे तीन हजार किमी लांबीचे पसरलेले आहे. यामध्ये सात पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे तसेच समुद्र नद्या खाड्यांमध्ये पावसाच्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी 186 आउटलेट आहेत. मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य वाहिन्या व आउटलेट हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

महानगरपालिकेकडून आत्तापर्यंत 3 हजार 679 मॅन होल वर संरक्षण जाळी बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मुंबईतील पावसापूर्वी कामाचा भाग म्हणून महानगरपालिका मेन हॉलची तपासणी आवर्जून करत असते. यंदाच्या वर्षी देखील मेनहोलसेल काम आणि त्याची तपासणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी स्वतःहून मेन हॉलचे झाकण काढण्याचे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल चहल यांच्याकडून करण्यात आले आहे.

शिंदे काका आदित्य बाबाला का सांभाळतात?

Exit mobile version