शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाकडून आज शिर्डी (Shirdi) विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. तसेच दोन महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ (Board Of Trustee) स्थापन करायचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Highcourt) दिला आहे. काहीं दिवसांपूर्वी भाविकांनी शिर्डी मंदिरात (Saibaba Mandir) हार व फुल आत घेऊन जायला मज्जाव करण्यात आला होता, यावर मोठ्या प्रमाणत आंदोलन करण्यात आले होते. हा मुदा राज्यभर गाजत असतांनाच आता औरंबागाबाद कोर्टाने विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे निर्णय दिल्याने सगळीकडे एकच खळबळ माजली आहे.


सहा महिन्यापूर्वी शिर्डी साई संस्थेने नवीन विश्वस्थ नेमण्यात आले होते. पण साईबाबा संस्थेच्या जाहीरनाम्यानुसार हे विश्वस्त मंडळ नेमण्यात आल्या नसल्याचे आरोप करण्यात आले होते. माजी विश्वस्त रामजी शेळखे यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार विश्वस्त मंडळ साईबाबा मंदिर संस्थानच्या नियमाच्या अधीन नसल्याने बरखास्त करण्यात यावे अशी मागणी याचिके द्वारे करण्यात आली होती. दरम्यान याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून याबाबतची केस औरंगाबाद खंडपीठात होती, आज याबाबत कोर्टाने निर्णय देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.

दसरा मेळावा वादात अभिजित बिचुकलेंची उडी

 

चार ते पाच महिन्यापासून औरंगाबाद खंडपीठात याबाबत सुनावणी सुरु होती. अखेर आज औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर हे मंडळ बरखास्त झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेशही औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. शिर्डी साईबाबा मंदिर संस्थान च्या विश्वस्त मंडळावर राज्यभरातून सभासद नेमण्यात येत असून १६लोकांना या मंडळावर निवडण्यात येते.

हे ही वाचा :

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही मशीद वादा प्रकरणी न्यायालयात ११ याचिका प्रलंबित

ललित प्रभाकरच्या ‘सनी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

ललित प्रभाकरच्या ‘सनी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version