नारायण राणेंना मुंबई हाय कोर्टाचा मोठा धक्का

नारायण राणेंना मुंबई हाय कोर्टाचा मोठा धक्का

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंना १० लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. “अधीश” बंगल्या प्रकरणी हा आदेश देण्यात आला आहे. सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नारायण राणे यांचा जुहूमध्ये बंगला आहे. तो समुद्र किनाऱ्याजवळ आहे. राणे यांच्या जुहूमधील ‘अधीश’ या सात मजली बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित होऊ शकत नाही, असं म्हणत मुंबई हायकोर्टाने राणे यांचे मालकी हक्क असलेल्या कालका रिअल इस्टेट कंपनीची याचिका फेटाळली आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेशसुद्धा मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यातील बांधकाम नियमित करण्यासंदर्भातील याचिका फेटाळत असताना हायकोर्टाने मुबंई महानगरपालिकेलाही महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. पुढील दोन आठवड्यांत अतिरिक्त बेकायदा बांधकाम तोडण्याची कारवाई करून नंतरच्या एक आठवड्यात कृती अहवाल सादर करा, असे हायकोर्टाकडून पालिकेला सांगितले आहे. राणेंनी आपल्या कंपनीमार्फत दाखल केलेल्या या अर्जाचा विचार करायचा की नाही? याबाबतचा आपला निकाल हायकोर्टानं २३ ऑगस्ट रोजी राखून ठेवला होता. राणेंनी याचसंदर्भात दाखल केलेला पहिला अर्ज पालिकेनं नियमांच्या आधारावर रद्द केला होता. ज्याला राणेंनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं, मात्र कायद्याच्या चौकटीत हा निर्णय योग्य ठरवत हायकोर्टानं निकाल पालिकेच्या बाजूनं दिला.

उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी, शिंदे कोणाची भेट घेणारा?

प्रकरण काय ?

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेला दिली होती. मात्र, आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोपही दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्याची नोटीस बजावली होती. मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत सेक्शन ४८८ नुसार मुंबई महानगरपालिकेकडून राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने बांधकाम तोडण्याची नोटीस बजावली होती. त्यावरून राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. राणे यांच्यावरील कारवाई ही महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने केल्याचा आरोप राणे आणि भाजपने केला होता.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न; अजित पवार स्पष्टच बोलले

शिक्षण मंत्र्यांचे मतदारसंघ असलेल्या पुण्यात विद्यार्थ्यांचे ‘अभाविप’ आंदोलन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version