Wednesday, September 25, 2024

Latest Posts

Akshay Shinde Encountar: चार पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला? रिव्हॉल्वर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे काय? मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना गंभीर सवाल

Akshay Shinde Encountar: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना सोमवारी (२३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून यात आता नवा ट्विस्ट आला आहे. अक्षयच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल करून हे एन्काउंटर फेक असल्याचा दावा केला आहे. यावरून आज (बुधवार, २५ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांवर गंभीर सवाल उपस्थित करत पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुंबई हायकोर्टाने या सुनावणीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोलत सवाल उपस्थित केले आहेत. नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? चार पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला हे समजणं थोडं कठीण जातंय. तसेच, रिव्हॉल्वर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे काय? असा सवाल कोर्टाने केला आहे. ‘एन्काउंटर झालेल्या व्हॅनमध्ये अक्षय हा एकटा आरोपी होता. आरोपीला दुसरीकडे घेऊन जाताना तो आक्रमक होईल अशी कोणतीही लक्षणे त्याच्याकडे नव्हती. नॉर्मली तुम्ही गोळी हातावर किंवा पायावर मारता कि डोक्यात मारता? त्या गाडीत जे पोलीस अधिकारी होते ते पूर्णपणे प्रशिक्षित आणि पारंगत होते. अश्या चार व्यक्ती आणि त्यांच्याबरोबर एक अधिकारी ज्याने अनेक एन्काउंटर यशस्वी केले आहेत, अश्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर तो एकटा आरोपी वरचढ ठरून, पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तूल हिसकावून गोळीबार कसे काय करेल? असे सवाल हायकोर्टाने उपस्थित केले आहेत.

हायकोर्टाने पुढे हेदखील स्पष्ट केले कि ‘आमचा पोलिसांच्या कारवाईवर सवाल नाही परंतु जे सत्य आहे, त्या व्हॅनमध्ये जे काही घडले. ते समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी आता अक्षय शिंदेंवर जी गोळी झाडली त्या हत्यारांचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा,’ असे हायकोर्टाने सांगितले आहे. ‘अक्षय शिंदेला जी गोळी झाडली ती किती अंतरावरून झाडली? ती अक्षयच्या शरीराच्या कोणत्या भागावर लागली? कोणत्या भागातून बाहेर गेली? या सर्व गोष्टी फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट होतील. त्यामुळे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट होतील. त्यामुळे फॉरेन्सिक अहवाल सादर करा. अक्षय शिंदेचा मृत्यू हा गोळी मारून लागला हे पोस्टमार्टेममधून स्पष्ट झाले आहे. परंतु, ती गोळी चालवण्यामागचा हेतू काय होता? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss