सीमा वादाचे पडसाद राज्यभर, औरंगाबादमध्ये युवा सेना आक्रमक

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायाला मिळत आहे. दरम्यान याच मुद्यावरून औरंगाबादमध्ये युवा सेना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.

सीमा वादाचे पडसाद राज्यभर, औरंगाबादमध्ये युवा सेना आक्रमक

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायाला मिळत आहे. दरम्यान याच मुद्यावरून औरंगाबादमध्ये युवा सेना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. आज सकाळी (बुधवार, दि. ७ डिसेंबर) शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात कर्नाटकमध्ये जाणाऱ्या गाड्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. सोबतच भगव्या रंगाने बसवर जय महाराष्ट्र सुद्धा लिहिले.

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादावरून तणावाचे वातावरण आहे. दरम्यान काल बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहे. औरंगाबादमध्ये देखील आज कर्नाटक बसला काळं फासण्यात आले आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. तर काळे फासण्यात आलेल्या बस सुरक्षित ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. तर घटनास्थळी पोलीस देखील पोहचले असल्याचे बोलले जात आहे.

पुण्यात पडसाद

या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. पुण्यात स्वारगेट येथून कर्नाटकात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी गाडय़ांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. या गाडय़ांवर ‘जय महाराष्ट्र’ असे घोषवाक्य लिहून कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.

कोल्हापूरमध्येही राडा

कोल्हापुरातही या घटनेचा निषेध करण्यात आला. हा हल्ला पूर्वनियोजित असून, त्याला कर्नाटकातील भाजपा सरकारचे पाठबळ असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. कर्नाटकची गुंडगिरी अशीच सुरू राहिली तर त्याला महाराष्ट्रातूनही कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ट्रकवरील हल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेली काच फोडून शिवरायांचा अवमान करण्यात आला आहे. त्याचा निषेध करत माजी खासदार संभाजीराजे यांनी या हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली.

जोरदार घोषणाबाजी

औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी साडेपाच वाजता युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे आंदोलन सुरु केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार, महराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हे ही वाचा : 

शिंदे आणि बोम्मई यांच्यात फोनवरून चर्चा, तरी बोम्मईंचा आडमुठेपणा कायम

Datta Jayanti 2022 आज दत्त जयंती, देवी अनुसूयाच्या धर्माची परीक्षा कशी घेतली घ्या जाणून

मुंबईकरांचा ‘श्वास’ गुदमरला !, हवेत प्रदूषणाची वाढ

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version