युट्यूब व्हिडिओ बघून मुलाने घरात बॉम्ब तयार केल्याची घटना

नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या या तरुणानं धक्कादायक प्रकार केला आहे.

युट्यूब व्हिडिओ बघून मुलाने घरात बॉम्ब तयार केल्याची घटना

युट्यूब व्हिडिओ बघून मुलाने बॉम्ब तयार केला.

मुंबई : युट्यूब हे आवश्यक ती माहिती मिळवण्याचं आणि माहिती पुरवण्याचं माध्यम आहे. परंतू या माध्यमावर मर्यादा नसल्याने आजकाल लोक यावर काहीही शेअर करतात आणि ते बघणाऱ्यांची संख्या ही अफाट आहे. अनावश्यक व्हिडिओ पाहूनच त्याचे अनुकरण केल्याच्या धक्कादायक बातम्या ही आपण अनेकदा पहिल्या असतील. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. घरात कुणीही नसताना युट्यूबवर (YouTube Video) व्हिडिओ पाहून एका मुलाने बॉम्ब तयार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. Crime news in Jogeshwari

हेही वाचा :

सुष्मिता सेन व ललित मोदींच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

चार लाखाचा कॉम्पुटर खरेदी करता यावा, म्हणून एक तरुणाने चक्क युट्युबवर व्हिडीओ बघून घरी बॉम्ब बनवला आणि जोगेश्वरीतील एका शिपमेंटला आग लावून दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून विम्याचे पैसे मिळतील, त्यातून आपल्याला लाख मोलाचा कॉम्पुटर खरेदी करता येईल, हा विचार या मुलाने या कृती मागे केला. पोलिसांनी या मुलाला अटक करून त्याची चौकशी करताच ही बाब उघड झाली.

हेही वाचा :

पंजाबी गायक दलेर मेहेंदीला दोन वर्षाचा तुरुंगवास, मानवी तस्करीचा आरोप

नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या या तरुणानं धक्कादायक प्रकार केला आहे. पैसे कमावण्यासाठी त्याने दोन कॉम्प्युटर प्रोसेसर खरेदी केल्याचं एक बनावट बिल तयार केलं आणि एका विमान कंपनीची पॉलिसी खरेदी केली. युट्युबवर मुलानं विम्याबाबतचा व्हिडीओ पाहून माहिती मिळवली. एखाद्या शिपमेंटला आग लागली किंवा नुकसान झालं, तर इलेक्ट्रीक सामानाची मूळ किंमत आणि दहा टक्के नुकसानभरपाई मिळते, अशी माहिती या मुलाला मिळाली होती. या मुलानं घरात कुणीही नसताना युट्यूबवर व्हिडीओ पाहिला. व्हिडीओ पाहून त्याने इलेक्ट्रीक सर्किट बनवलं आणि पार्सल एका खोट्या पत्त्यावर पाठवून दिलं. प्रवासात पार्सल फुटल्यास नुकसान भरपाई मिळेल असं या तरुणाला वाटलं होतं. मिळालेल्या पैशातून त्याला चार लाखाचा कॉम्प्युटर आणि मोबाईल खरेदी करायचा होता. हा सगळा विचित्र प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसही अवाक झाले.

 

Exit mobile version