अमरावतीमध्ये इमारत कोसळली; ४ जणांचा मृत्यू

अमरावतीमध्ये इमारत कोसळली; ४ जणांचा मृत्यू

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अमरावतीमधील एक जुनी इमारत कोसळली आहे. अमरावती शहरातील प्रभात चित्रपटगृहाजवळ असलेली एक जुनी इमारत अचानक कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक जण दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तर आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासन आणि पोलिस, अग्निशमन दलाचे बंब आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

शहरातील मुख्य बाजारातील इमारत कोसळल्याची घटना समोर आली असून मलब्याखाली चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून काही लोकं आत अडकल्याची माहिती मिळत आहे. या ढिगाऱ्यातून एक जणाला सुरक्षित बाहेर काढण्यात यंत्रणाना यश आले आहे. दरम्यान या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. मुख्य बाजारातील प्रभास टॉकिज च्या बाजूला असलेली जुनी दोन मजली इमारत महानगरपालिकेने सात वेळा नोटीसा दिल्या होत्या, त्यानंतर मालकाने वरचा मजला हटवला होता. मात्र खालच्या मजल्यावर सिलींगचे काम सुरू असताना ही इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. खाली बॅग हाऊस असे दुकान होते त्यामुळे त्या दुकानाचा मालक आणि ग्राहक मलब्याखाली दबल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला पाच जण दबल्याचे सांगण्यात आले होते पण एक जणाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

राजदीप बॅग हाऊस असे या कोसळलेल्या इमारतीचे नाव आहे. इमारतीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू असून आतापर्यंत या ढिगाऱ्यातून दोन लोकांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संचालक रवी परमार यांच्यासोबत त्यांच्या दुकानातील काही लोक दबल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनास्थळी महानगरपालिकेचे माजी महापौर चेतन गावंडे आमदार सुलभा खुडके यांनी परिस्थितीची पाहणी केली.

हे ही वाचा :

BTS चे सदस्य जीनचे ‘या’ गाण्याचे प्रकाशन रखडले

Pushpa The Rise : मुंबईतील ज्यूस सेंटरमध्ये दिसला पुष्पा फिव्हर, पाहा व्हिडीओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version