Nashik News : नाशिकमध्ये ‘बर्निंग बस, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर राज्यसरकारची घोषणा

Nashik News : नाशिकमध्ये ‘बर्निंग बस, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर राज्यसरकारची घोषणा

 आज (शनिवारी) सकाळी नाशिकमध्ये दुर्देवी अपघात झाल्याची बातमी समोर आली. अपघातानंतर एका खाजगी बसने पेट घेतला. बसला लागलेल्या या आगीमध्ये एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग एवढी भीषण होती की काही वेळात झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यानंतर घटनेची माहिती आगीसारखी शहरात पसरली. काहींनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही आगीतच होरपळले.

या अपघातानंतर खासगी बसने पेट घेतला ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बसच जळून खाक झाली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल आहे. या अपघातात २१ प्रवाशी जखमी झाले आहेत तर १ जण गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातात जीव वाचवणाऱ्या काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रवाश्यांनी आपल्या मुलांचे जीव वाचवण्यासाठी त्यांना घेऊन खिडकीतून उड्या मारल्या. स्थानिक लोकांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले. एक क्षण आम्ही मृत्यूच्या जवळ असल्याचं जाणवलं असंही प्रवाशी सांगतात. काही जण जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते. किंकाळ्या फोडत होते. पण त्यांना बसमधून बाहेर पडता येत नव्हते.

हेही वाचा : 

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. तिथल्या जिल्हाधिकारी आणि सिव्हील सर्जनशी मी सातत्याने संपर्कात आहे. दुर्घटनेमध्ये जखमी रूग्णांच्या उपचारांमध्ये कोणताही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसंच रूग्णांच्या उपचारांसाठी खाजगी रूग्णालय आणि डॉक्टरांचीही मदत घेतली जाणार आहे.

मृतांच्या नातेवईकांना शासनाच्या वतीने ५ लाख रूपये देण्यात येणार आहेत. तसंच जखमींवर शासनाच्या वतीने उपचार देण्यात येतील. ट्रकच्या डिझेल टँकला बसने धडक दिल्याने या टँकने पेट घेतल्याची प्रथमदर्शनी माहिती आयुक्तांनी दिली आहे. शिवाय याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचंही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

कोजागिरी पोर्णिमेसाठी स्पेशल मसाला दूध कसे बनवायचे, जाणून घ्या रेसिपी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या गमावले त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

Exit mobile version