Burning Bus in Nashik : नाशिकमध्ये अग्नितांडव सुरूच, वणी गडावर धावत्या ST बसने घेतला पेट

Burning Bus in Nashik : नाशिकमध्ये अग्नितांडव सुरूच, वणी गडावर धावत्या ST बसने घेतला पेट

आजच्या दिवशीची नाशिक मधून दुसरी धक्कादायक घटना समोर येत आहे. वणी गडावर जाणाऱ्या बसल्यासुद्धा आग लागली. अर्धा तास आधीची घटना आहे. तेथील स्थानिक रहिवासी व प्रशासनाने आग विझवली आहे. कुठलीही जीवित हानी झालेली नाही.सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली घटना. कुठल्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसल्याची एसटी प्रशासनाची माहिती. घटनेनंतर मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

नाशिक (Nashik) बस अपघात दुर्घटनेनंतर (Nashik Bus Fire Accident) सप्तशृंगीगडावरून (Saptshrungi Gad) आणखी एक अपघाताची बातमी समोर येत असून सप्तश्रृंगी गडावर ही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. आज पहाटे नाशिक शहराजवळील औरंगाबाद रोडवर बस आणि ट्रकच्या भीषण झाल्यानंतर दुर्दैवाने सप्तशृंगी गडावर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसला आग लागल्यानंतर प्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच प्रवाशांनी बस मधून उड्या मारल्याने प्रवासी सुखरूप बचावले आहेत. मात्र यात बस जळून खाक झाली आहे. सप्तश्रुंगी गडावर नवरात्री पासून यात्रा होत असते. याच यात्रेसाठी प्रवाशांनी भरलेली बस सप्तश्रुंगी गडावर निघाली होती. दरम्यान गडावर जात असताना अचानक बसला आग लागली. वेळीच आग लागल्याची माहिती प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रवाशांनी बसबाहेर उड्या घेतल्या. मात्र या घटनेतही बस जळाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाची बस नाशिक येथून प्रवाशांनी घेऊन सप्तश्रुंगी गडावर गेली होती. यावेळी सप्तश्रुंगी गडावर जात असताना अचानक बसने पेट घेतला. यावेळी प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून बाहेर पळ काढला. दरम्यान आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सर्व प्रवाशी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र वेळीच स्थानिक नागरिकांनी धावपळ करीत प्रवाशांना बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.

हे ही वाचा:

२० वर्षीय गोविंदा प्रथमेशची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली

Mirzapur : पंकज त्रिपाठी यांनी चित्रपट,ओटीटी आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून किती कोटी कमावतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version