जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड आणि धाराशिव बंदची हाक

मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता.

जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड आणि धाराशिव बंदची हाक

मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. या दरम्यान त्यांची प्रकृती आज बिघडली होती. पण जरांगे यांनी तरीही उपोषण मागे घेतलं नाही. त्यांचं उपोषण सुरुच आहे. मनोज जरांगे यांची अवस्था पाहून गावकऱ्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे यांनी ऐकलं नाही. याच पार्श्वभूमीवर जालन्यातील वडीगोद्री गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री इथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणस्थळीच घोषणाबाजी झाली. यावेळी मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. तर आता या सर्व घडामोडीनंतर आज मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड आणि धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे मागील पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. आजचा बंद शांततेत पार पडेल अशा आश्वासन जरांगे समर्थकांनी दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बीड शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बीड जिल्हा हा मनोज जरांगे पाटलांचे जन्म गाव असल्याने बीड मधून पहिला बंद पुकारण्यात आला आहे.

मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर –

जालन्यातील अंतरवलीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी वडीगोद्रीत अडवलं. बॅरिकेटिंग करत रस्ता पोलिसांनी बंद केला. त्यामुळे मराठा समन्वयक आक्रमक झाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री इथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणस्थळीच घोषणाबाजी झाली. रात्री उपोषणस्थळी मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आले. मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून रात्री घोषणाबाजी करण्यात आली. अंतरवलीक येणाऱ्या आंदोलकांना अडवल्याने मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. १५ मिनिटात बॅरिकेटिंग काढा अन्यथा तेचं बॅरिकेटिंग सागर बंगल्यापर्यंत फेकतो, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. रात्री मनोज जरांगेंनी मंत्री दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांना फोन केला. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग हटवलं. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. अंतरवली सराटी गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर वडीगोद्री या गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. दोन्ही बाजूच्या आंदोलकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. वडीगोद्री येथून मनोज जरांगे यांच्या आंदोलकांच्या दिशेला गाड्या जात होत्या. त्याच दरम्यान आमच्या गाड्या सोडत नाहीत आणि त्यांच्या गाड्या का सोडतात? या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा आंदोलक समोरासमोर आले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या मागण्या केल्यात?

सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
हैदराबाद गॅझेट लागू करावे.
सातारा गॅझेट लागू करावे.
बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे.
मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत.

हे ही वाचा:

तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI…

PM Narendra Modi देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version