spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केंद्र सरकारकडून नागरिकांना दिलासा, खाद्यतेलाच्या किंमतीत 15 रुपयांनी घसरण

मध्यंतरी काळात खाद्यतेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली होती. त्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसला होता.

मुंबई : मध्यंतरी काळात खाद्यतेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली होती. त्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसला होता. मात्र आता आगामी काळात खाद्यतेलांच्या किमतीमध्ये मोठी घट झालेली दिसून येणार आहे. त्यानंतर आज तत्काळ खाद्यातील असोसिएशन ला केंद्र सरकारकडून निर्देश देण्यात आले. आता खाद्यतेलांमध्ये पंधरा रुपयांनी घसरण झालेली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून खाद्यतेल कंपन्यांना एका आठवड्यात उत्पन्नाच्या किमती कमी करण्याचे सूचना देण्यात आले आहेत.

  हेही वाचा : 

अभिनेत्री अमृता पवार चे लग्नसोहळातील फोटो!

मागील महिन्यात सर्वप्रमुखाद्यतेलांच्या ब्रँड्सनी दहा ते पंधरा रुपये यांनी किमती कमी केल्या होत्या. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडून नियमित देखरेख व सर्व सरकारच्या विविध उपायोजनामुळे हे शक्य झाले होते केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घट झाली होती असे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव यांनी माहिती दिली.

भारत जवळपास 60 टक्के खाद्यतेल आयात करतो गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारा तेलाच्या किमती घसरले आहेत याचाच परिणाम भारतीय बाजारात दिसून येतो. ब्रँडेड खाद्यतेलाच्या किमती कमी होतील मात्र प्रीमियम खाद्यतेल ब्रँडेड किंमत कमी व्हायला काहीसा वेळ अजून लागेल. खाद्य तेलाचा भाव कमी झाल्यामुळे परिणामी खाद्यपदार्थांच्या महागाईचा दरही कमी होण्याची शक्यता आहे.

जेवणानंतर लगेचच करु नका या गोष्टी नाहीतर होतील गंभीर परिणाम

Latest Posts

Don't Miss