Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

मध्य रेल्वेनं (Central Railway) प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान (Thane Railway Station) तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे.

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

मध्य रेल्वेनं (Central Railway) प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान (Thane Railway Station) तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ठाण्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने जात असल्याची माहिती आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या गाड्या मुलुड स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत, या बिघाडामुळे काजूंरमार्ग स्थानकापर्यंत गाड्या खोळबंल्याची माहिती मिळत आहे.संध्याकाळची वेळ असल्याने घरी जाण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना यामुळे त्रास सहन कराव लागत आहे. ठाणे स्थानकात बिघाड झाल्याने रेल्वेचा घोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.

सध्या ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी झाली आहे. अर्धा ते पाऊण तासापासून ठाणे स्थानकातून एकही रेल्वे गेलेले नाही. याचं कारण मुलुंडवरून डाऊन फास्ट ट्रेन लोकल स्लो ट्रॅकवर येत होती ती तांत्रिक बिघाडामुळे मध्येच आडकल्याचे सांगितले जात आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. या बिघाडामुळे डाऊन स्लो, अप स्लो आणि डाऊन फास्ट या तिन्ही सर्व्हिसेस बंद पडल्या.

मध्य रेल्वेवर (Mumbai Local) असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळं मध्य रेल्वेचं वाहतूक वेळापत्रक काहीसं मागे पडलेलं आहे. मध्य रेल्वेवरुन धावणाऱ्या काही गाड्या उशिरानं धावत आहेत. ऐन सणासुदीच्या वेळी मध्य रेल्वेवर झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे घरच्या दिशेनं निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे (CSMT) जाणारी वाहतूक उशिरानं सुरु आहे.

 हे ही वाचा:

मोदींचा व्हिडिओ होतोय तुफान वायरल ! रुग्णवाहिकेसाठी पंतप्रधानांनी थांबवला ताफा

68th National Film Awards 2022 : ‘हा ‘ सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version