छ. संभाजी महाराजांचे अधिकृत छायाचित्र लवकरच महाराष्ट्रासमोर येणारं

छत्रपती संभाजी महाराज यांचे अधिकृत छायाचित्र (Chhatrapati Sambhaji Maharaj) नेमकं कसं असावं? याची निवड करताना कोणकोणत्या छायाचित्रांचा विचार करणे गरजेचं आहे. आणि याबाबत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी आपलं मत मांडलं आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणले

छ. संभाजी महाराजांचे अधिकृत छायाचित्र लवकरच महाराष्ट्रासमोर येणारं

छत्रपती संभाजी महाराज यांचे अधिकृत छायाचित्र (Chhatrapati Sambhaji Maharaj) नेमकं कसं असावं? याची निवड करताना कोणकोणत्या छायाचित्रांचा विचार करणे गरजेचं आहे. आणि याबाबत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी आपलं मत मांडलं आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणले की , यासंबंधी इतिहासाची मागील पाने उघडून बघणे आणि त्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. तसेच इंद्रजित सावंत म्हणतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याठिकाणी पारसनीस यांच्या संग्रहालयातील चित्र सर्व संशोधकांना मान्य आहे. त्याबद्दल कोणतीही शंका संशोधकांना वाटतं नाही.

यावर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा देखील समावेश राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारकडून आतापर्यंत संभाजी महाराज यांचे अधिकृत छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj) महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत मान्यताप्राप्त छायाचित्र लवकरच समोर येणार आहे. संभाजी महाराजांचे छायाचित्र निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे अधिकृत छायाचित्र लवकरच महाराष्ट्रासमोर उपलब्ध होईल असे ठाम मत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केले आहे. त्याचबरोबर एक छायाचित्र ५ ते ६ वर्षांपूर्वी ब्रिटीश संग्रहालयात आढळून आलं आहे. त्यामध्ये संभाजीराजे मांडी घालून बसले आहेत. तिसरं छायाचित्र अहमदनगरच्या वस्तू संग्रहालय येथे आहे, पण ते आपल्या सगळ्यांना वेदना देणारं आहे. औरंगजेबने उंटावरून त्यांचे अतोनात हाल केले त्यावेळचं चित्र आहे, पण यामध्येही संभाजीराजे यांचा चेहरा करारी आहे. हे छायाचित्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यासंदर्भात तीन छायाचित्रांसह कागदपत्रांची माहिती मागवण्यात आली आहे. संबंधित कागदपत्रांची माहिती मागवण्यात आली.

राज्य सरकारकडून राष्ट्रपुरुषांसह महापुरुषांच्या जयंती साजऱ्या केल्या जातात. यावर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा देखील समावेश राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारकडून आतापर्यंत संभाजी महाराज यांचे अधिकृत छायाचित्र ( official photograph of Chhatrapati Sambhaji Maharaj) प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता ते छायाचित्र आता लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूरसह सातारामधून छत्रपती संभाजी महाराजांच्या छायाचित्राच्या तीन प्रती आणि संबंधित कागदपत्रांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वंशजांना राज्य सरकारकडून पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांचं अधिकृत छायाचित्र लवकरच उपलब्ध केलं जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाते. संभाजीराजे यांचे हे अधिकृत छायाचित्र पाठ्यपुस्तकात आणि सर्व शासकीय कार्यालयात वापरले जाणार आहे.

हे ही वाचा : 

Mumbai Police यांचे संपूर्ण शहरात ‘ऑल आऊट ऑपरेशन’

Nitin Deshmukh यांची जलसंघर्ष यात्रा रोखली, हात आणि पाय पकडून देशमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version