spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आरेमधील वृक्षतोडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता

मुंबईतील गोरेगाव आरेत काल सोमवारी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ कडून करण्यात आलेल्या वृक्ष छाटणीचे प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयाकडे गेले आहे.

मुंबई : मुंबईतील गोरेगाव आरेत काल सोमवारी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ कडून करण्यात आलेल्या वृक्ष छाटणीचे प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयाकडे गेले आहे. वृक्ष छाटणीच्या नावाखाली आरेत आणि आरे कारशेडमध्ये झाडे कापण्यात आल्याचा आरोप करत या कामाविरोधात दोन याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

मुंबईतील वनशक्ती संस्थेचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांची एक याचिका असून दुसरी याचिका दिल्लीतील अ‍ॅड. रिषव रंजन यांची आहे. या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या असून यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. अ‍ॅड. रिषव रंजन यांनी आरेतील संपूर्ण कामाला स्थगिती देण्याची मागणी याचिकेद्वारे केली असून त्यांच्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडापीठासमोर होणार आहे.

हेही वाचा : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

काल रात्री उशीरा आरेमध्ये मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी जमा झाले होते. मुंबई पोलिसांनी आरे कारशेड 3 जवळ मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी कार शेड 3 जवळ जमलेल्या सर्व पर्यावरण प्रेमींना आवाहन करत घरी जाण्यास संगितले. तसेच पोलीस स्टेशनमधून परवानगी घेऊन दिवसात आंदोलन करा, असे संगणूयात आले. मात्र तरीही आंदोलक ठाम आहेत आणि साखळी बनवून आंदोलन करत होते. नंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मध्यरात्री पर्यावरण प्रेमी आंदोलक घरी परतले.

Latest Posts

Don't Miss