कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, सिंधुदुर्गात पुढील 48 तास रेड अलर्ट

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, सिंधुदुर्गात पुढील 48 तास रेड अलर्ट

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत सिंधुदुर्गामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासासाठी सिंधुदुर्गात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच आज मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचं ‘डिप्रेशन’मध्ये रुपांतर झाल्याने पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

अरबी समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग वाढला आहे. सिंधुदुर्ग मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या जिह्ल्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. खोल समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे मासेमारी बंद करण्यात आली आहे. समुद्र पर्यटन देखील बंद ठेवण्यात आले आहे. ४०० नौका सुरक्षिततेच्या दृष्टीनं देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. तामिळनाडू, गोवा, गुजरात, महाराष्ट्र राज्यातील नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. देवगड बंदरामध्ये ४०० पेक्षा जास्त नौका आश्रय घेण्यासाठी आल्या आहेत. देवगड बंदर आहे आश्रयासाठी सुरक्षित आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू या सर्व ठिकाणच्या ४०० पेक्षा जास्त नौका आश्रयासाठी थांबल्या आहेत. यामध्ये गुजरातमधील १८० नौका, तामिळनाडू मधील पाच नौकानचा समावेश आहे. हवामान विभागाने ताशी ४५ ते ६५ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा आणि अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, रायगड, गोवा, सिंधुदुर्ग या भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काही भागात पूर येण्याची शक्य वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अलिबाग समुद्र किनारी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नांगरून ठेवलेली मासेमारी नौका बुडाली आहे. पाऊस थांबल्यानंतर नौका शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. बुडालेल्या नौका मालकाचे ४ लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच रायगड मध्ये पावसाळी वातावरण झाले आहे. पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोसाट्याचा वारा,मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरतीच्या लाटांच्या माऱ्यात मासेमारी नौकेचा टिकाव लागला नाही.

हे ही वाचा: 

PMPML बसमध्ये आता UPI पेमेंट सेवा उपलब्ध

कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेसचा खोळंबा, दिवा रेल्वे स्थानकात रेल रोको

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version