राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजपासून पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई :- अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजपासून पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म्हणजे आज पासून ८ ऑगस्टपर्यंत राज्याच्या सर्वच भागात पावसाचा ईशारा हा देण्यात आला आहे. महाराष्ट्रभर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हि वर्तवली जात आहे. हवामान विभागांकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या दरम्यान घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तिकडे विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काल दिवसभर लातूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे नागरिकांचे जनजीवन हे काहीसे विस्कळीत झाले आहे. अनेक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक रस्ते हे जलमय झाले त्याने संपूर्ण वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. तसेच संपूर्ण देशातील विविध भागांमध्ये देखील पावसाने त्याची दमदार हजेरी ही लावली आहे. देशातील कर्नाटक, केरळसह दिल्लीमध्ये देखील पाऊस जोरदार बरसला आहे. तर दुसरीकडे राज्यामध्ये मुंबईसह ठाणे,पुणे, सातारा, धुळे,लातूर या परिसरात पाऊस हा झाला आहे. येत्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती सतर्कता बाळगावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

हे ही वाचा : – 

आरबीआयच्या रेपो दारात वाढ

 

 

Exit mobile version