spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठवाड्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

सध्या राज्यातील वातावरण हे सारखे बदलत आहेत. हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून सहा मार्चपर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवली गेली आहे.

सध्या राज्यातील वातावरण हे सारखे बदलत आहेत. हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून सहा मार्चपर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवली गेली आहे. दरम्यान मराठवाड्यातील (Marathwada) छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह परभणी जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील वातावरण हे सारखे बदलत आहेत. हवामान विभागाने काही ठिकाणी पाऊस पडणार याची देखील शक्यता वर्तवली आहे. अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढली जाणार आहे कारण अनेक ठिकाणी गव्हाची काढणी ही सुरु आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. ५ अंडी ६ मार्च रोजी जालना जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या शक्यता पावसाची ७ मार्च रोजी वर्तवण्यात आली आहे.

तसेच ७ मार्च रोजी परभणी जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात ५ ते ७ मार्चदरम्यान गडगडाटासह हलक्या स्वरुपाच्या हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात पुढील पाच दिवस वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. वनामकृविच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने हा हवामान सल्ला दिला आहे.

हे ही वाचा :

Sandeep Deshpande घेणार आज पत्रकार परिषद, हल्ल्याप्रकरणी तपासाला वेग तर २ जण ताब्यात

Women’s Premier League, पहिला सलामी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स

Follow Us.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss