महाराष्ट्रामध्ये पुढील ४८ तासात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्रामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. पुढील ४८ तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये पुढील ४८ तासात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्रामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. पुढील ४८ तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. सोमवारी २६ जून रोजी पहाटेपासूनच महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अखेर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विकेंडच्या दिवशी पाऊस झाल्याने मुंबईकरांनी पावसाचा मनसोक्त आनंदही घेतला. विविध जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजाही सुखावला आहे. बंगालच्या उपसागरामधील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीपर्यंत पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वसईमध्येही शनिवारी इमारतीचा सज्जा कोसळला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही भागांतील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कुलाबा वेधशाळेने रविवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये ८६ मिमी पावसाची नोंद केली, तर उपनगरातील प्रतिनिधी सांताक्रूझ हवामान केंद्राने याच कालावधीत १७६.१ मिमी पावसाची नोंद केली, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे.

हे ही वाचा:

घरच्या घरी वापरली जाणारी मोहरी ठरते Bad Cholesterol वरील रामबाण उपाय

शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ चित्रपट थिएटरमध्ये नाही दाखवणार ; निर्मात्यांनी कारण सांगितले ….

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, सिद्धरामय्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version