Rohini Khadse यांच्या ‘बदाम ‘टीकेला Chandrakant Patil यांचं दिमाखदार उत्तर

मी त्यात नेहमी गोंधळून जातो. त्यामुळे बहुतेक रोहिणी ताई त्या अपक्ष आमदार चंद्रकात पाटील यांना बोलल्या असाव्यात. एवढा मोठा मी मला बदामाची काय आवश्यकता आहे."असं म्हणत मिश्किल पणे प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेवरुन देखील शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली घोषणा पूर्ण होईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

Rohini Khadse यांच्या ‘बदाम ‘टीकेला Chandrakant Patil यांचं दिमाखदार उत्तर

९  फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)यांच्या वाढदिवसानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लहान बालकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली होती. मात्र फेब्रुवारी उलटून चार महिने झाले असले तरी देखील त्यांची घोषणा ही फक्त घोषणाच राहिल्याने विरोधकांकडून त्यांना चांगलंच धारेवर धरलं जात आहे. अशातच राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे(Rohini khadse) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन त्यांना ‘बदाम’ खाण्याचा सल्ला दिला आणि त्यावर चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी चोख असं प्रत्युत्तर दिलं आहे.

काल दिनांक २५ जून रोजी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी एक पोस्ट टाकली आणि त्यात त्या असं म्हणाल्या,” सर्व महिला पदाधिकारी ,कार्यकर्त्या भगिनींना सस्नेह नमस्कार…. आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ फेब्रुवारी  २०२४ रोजी येत्या जुन महिन्यापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ पासुन ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा सर्व जाती, धर्म ,पंथातील उच्च शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थिनींना यापुढे कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नसल्याची घोषणा केली होती.

यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी यासारख्या ८०० अभ्यासक्रमांचा समावेश असेल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते परंतु शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला सुरुवात झालेली असुन जुन महिना अर्धा उलटून सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केल्या प्रमाणे मुलींच्या मोफत शिक्षणाचा,फी माफीचा शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना प्रवेशासाठी भरमसाठ फी भरावी लागत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या भगिनींना चंद्रकांत दादा पाटील यांना एक स्मरणपत्र व स्मरण शक्ती तल्लख होण्यासाठी सोबत एक बदाम पोस्टाने त्यांच्या मंत्रालय येथील कार्यालयाच्या पत्यावर पाठवायचे आहेत.

रोहिणी खडसे(Rohini Khadse)  यांच्या टीकेवर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी ” मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांच्या तालुक्याचे आहेत आणि मी त्यात नेहमी गोंधळून जातो. त्यामुळे बहुतेक रोहिणी ताई त्या अपक्ष आमदार चंद्रकात पाटील यांना बोलल्या असाव्यात. एवढा मोठा मी मला बदामाची काय आवश्यकता आहे.”असं म्हणत मिश्किल पणे प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेवरुन देखील शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली घोषणा पूर्ण होईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हे ही वाचा

VIDHAN PARISHAD ELECTION 2024: कोण ठरणार मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ?

VIDHAN PARISHAD ELECTION: मुंबई पदवीधर मतदारसंघ कोणाच्या ताब्यात येणार ? ; जाणूयात सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version