spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केंद्राच्या माजी गृहमंत्र्यांच्या भावाने आज आत्महत्या केली – लातूर

आज लातूर मध्ये खळबळजनक बातमी हाती लागली आहे ,केंद्राचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने आज स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

आज लातूर मध्ये खळबळजनक बातमी हाती लागली आहे ,केंद्राचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने आज स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या गृहस्थांचे नाव चंद्रशेखर पाटील चाकूरकर असे आहे त्यांचे वय ८१ इतके होते . लातूर शहरातील आदर्श कॉलनी मध्ये चंद्रशेखर चाकूरकर यांचे निवासस्थान आहे तिथेच त्यांनी स्वतःला गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी घटनास्तळी धाव घेतली. चंद्रशेकर चाकूरकर ह्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.

 

शिवराज पाटील चाकूरकर आणि चंद्रशेखर पाटील चाकूरकर ह्या दोघांची घर शेजारी शेजारीच आहे . रोज चंद्रशेखर चाकूरकर हे शिवराज पाटील चाकूरकर ह्यांच्याकडे सकाळी फिरून आल्या नंतर यायचे तिथे थोड्यावेळ बसून चहा घेऊन पेपर वाचन हा त्यांचा नित्यक्रम होता त्याच प्रमाणे आज देखील ते सकाळी फिरून आल्यानंतर शिवराज पाटील चाकूर कर ह्याच्या घरी आले . सहज शिवराज पाटील चाकूरकर ह्यांच्या परिवारातील अधिकतर व्यक्ती कामामुळे लातूर मधील निवास स्थानी राहत नाही . आज तिथे शिवराज पाटील चाकूरकर ह्यांचे चिरंजीव हे उपस्थित होते. त्यांनी चंद्रशेखर चाकूरकर ह्यांना चहा घ्या तोवर मी आवरून घेतो असे सांगितले. परंतु ते गेल्यानंतर काही वेळातच गोळीचा आवाज आला ते धावत आल्यावर पहिला कि चंद्रशेखर चाकूरकर ह्यांनी स्वतःला गोळीझाडून आत्महत्या केली आहे. त्यांनी त्वरित पोलिसांना फोन केला.

या कारणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज –
चंद्रशेखर चाकूरकर ह्यांचे वय ८१ इतके होते त्यामुळे साहजिकच त्यांना अनेक व्याधींनी घेरले होते, सातच्या दुखण्याला ते कंटाळे असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर ह्यांना दोन मुलं आणि दोन मुली आहे सर्वांची लग्न झालेली आहेत. घरात अनेक मानस असल्याकारणाने त्यांनी एकांत साठी शिवराज पाटील चाकूकर ह्यांचे घर निवडले असावे. त्यांचा मुलगा पेशाने वकील आहे त्याने माहिती दिली कि त्यांची बायपास झाली आहे त्यामुळे त्यांना सतत काही ना काहि दुखणे असायचे.

हे ही वाचा :

मोठी बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडेवर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, जाणून घ्या हेल्थ अपडेट

Women’s Premier League, पहिला सलामी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स

ठामपाच्यावतीने गरजू महिलांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना’ सुरू करावी शिवसेनेची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss