दसरा मेळाव्यामुळे वाहतुकीत बदल; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

दसरा मेळाव्यामुळे वाहतुकीत बदल; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

दरवर्षी प्रमाणे यंदा हि दसऱ्या निमित्त शिवसेनाच दसरा मेळावा मजुंबाई येथे होणार आहे. पण या वर्षी शिवसेनेचे दोन दसरा मेकावा होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांचा बी के सी येथे तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क येथे होणार आहे. दिन गटाच्या मेळाव्यासाठी अनेक शिवसैनिक महाराष्ट्रातून मुंबई येथे दाखल होत आहे. या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. जोरदार शक्तीप्रदर्शनाची दोन्ही गट चांगलीच तयारी करत आहेत. या मेळाव्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. ही वाहतून कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात काही बदल करण्यात आले आहेत.

एमएमआरडीए मैदान बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा पूर्व मुंबई या ठिकाणी दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकरीता महाराष्ट्रातील विविध भागातून, वेगवेगळ्या वाहनातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पश्मिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी प्रवेशबंदी राहील :

पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमीली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

संत ज्ञानेश्वर मार्गावरुन कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शनवरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलींकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथुन प्रवेशबंदी राहील.

पूर्व दृतगती महामार्ग, चुनाभट्टीवरुन, बीकेसीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना कनेक्टर ब्रिज चढण दक्षिण वाहिनी येथुन जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

या पर्यायी मार्गांचा करा वापर :

पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सि. लींककडून बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने फॅमिली कोर्ट जंक्शन येथुन यु टर्न घेत एमएमआरडीए जंक्शन येथुन डावे वळन घेवुन टि जंक्शनवरुन कुर्ल्याकडे तसेच पूर्व दृतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.

संत ज्ञानेश्वर मार्गावरुन इन्कमटॅक्स जंक्शनकडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक रुग्णालयाजवळ विद्यामंदिर जंक्शनमधून कलानगरमार्गे धारावी टी जंक्शनवरुन पुढे कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.

खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मीकी नगरातून युटर्न घेवुन शासकीय वसाहत मार्गे कलानगर जंक्शन येथुन सरळ पुढे टी जंक्शन पुढे कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.

सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शनवरुन पश्चिम दृतगती महामार्ग, धारावीस वरळी सिलींकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन येथुन सिएसटी रोडने मुंबई विद्यापाठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथुन पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

पूर्व दृतगती महामार्ग, चुनाभट्टीवरुन, बीकेसीच्या दिशेने जाणारी सर्व वाहने सायन सर्कल येथे उजवे वळन घेत टी जंक्शन, कलानगर जंक्शन येथुन इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

हे ही वाचा:

सुका खोकला दूर करण्यासाठी करा रामबाण उपाय

Dasara 2022 : द्या दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version